संपूर्ण पुणे जिल्हा शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झाल आहे. छत्रपतींच्या शौर्याची गाथा याच पुण्यात लिहिली गेली. आणि म्हणूनच येणाऱ्या पिढ्यांना ही गाथा अनुभवता यावी इतिहासाच्या पाऊल खुणा जपण्यासाठी पुण्यात बाबासाहेब पुरंदरच्या संकल्पनेतून शिवसृष्टी उभारण्यात आली आहे. शिवजयंतीच्या निमित्तानं चला आपणही अनुभवूयात शिवरायांचा पराक्रम.