राज्यात एकीकडे दुष्काळाची तीव्रता वाढत असताना आणि अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या गंभीर बनत असताना, पनवेल महानगरपालिकेच्या वर्धापन दिनाच्या खर्चावरून नवा वाद निर्माण झाला आहे. पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेला दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्याला मुख्यमंत्री आणि इतर मंत्री उपस्थित राहणार आहेत. मात्र, या वर्धापन दिनासाठी तब्बल 2 ते 3 कोटी रुपये खर्च केले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी केला आहे. दुष्काळ आणि पाणीपुरवठ्यासारख्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष देण्याऐवजी महापालिकेकडून वर्धापन दिन, मॅरेथॉन आणि महापौर बंगल्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Squandering crores on the Panvel Municipal Corporation's anniversary celebrations while the state faces drought? What exactly is the allegation?