मुंबईत मातंग समाजाने उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांनी सीएमसएमटी ते मंत्रालयापर्यंतचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. बॅरिकेड्सवर चढून आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.. पोलिसांनी आंदोलकांना आवरण्यासाठी धरपकड केलीय. दरम्यान आंदोलकांचं शिष्टमंडळ सध्या मंत्रालयात गेलंय.. मात्र त्यांची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत भेट झाली का याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.