अँटिलिया बॉम्बस्फोट आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातील आरोपी माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेला विशेष NIA न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने 1 लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तितक्याच रकमेच्या जामीनदारावर त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, जामीन देताना न्यायालयाने त्यांच्यावर अनेक कठोर अटी लागू केल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार, साक्षीदारांचे जबाब पूर्ण होईपर्यंत वाझे यांना मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये प्रवेश करता येणार नाही. केवळ न्यायालयीन कामकाजासाठीच त्यांना विशेष परवानगी मिळू शकते. तसेच त्यांच्याकडे पासपोर्ट असल्यास तो NIA कडे जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
Sachin Waze Bail | Sachin Waze granted bail after five and a half years; first reaction from his lawyers.