Dhule| मजुरी करणाऱ्या दाम्पत्याला महिला मांत्रिकानं घातला गंडा, दीड लाख उकळले; साखरपुडाही लावला

मजुरी करणाऱ्या एका दाम्पत्याला महिला मांत्रिकाने गंडा घातल्याचा प्रकार धुळ्यातून समोर आलाय. मजूर दाम्पत्याच्या मुलीला जादूटोण्याची भीती दाखवत ही लूट करण्यात आलीय. गोदाघाटावर आंघोळ घालण्यासाठी या महिला मांत्रिकाने या दाम्पत्याकडून तब्बल दीड लाख रुपये उकळलेत. तसंच स्वत:च्या मुलाशी पीडित तरुणीचा जबरदस्तीने साखरपुडाही लावला. आजारपण आणि कौटुंबिक अडचणी दूर करण्याच्या नावाखाली हा गंडा घालण्यात आलाय़. सरिता जाधव असं या महिला मांत्रिकाचं नाव असून तिला आणि तिच्या साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. Dhule | Female occultist swindles laborer couple out of ₹1.5 lakh; even arranged an engagement ceremony.

संबंधित व्हिडीओ