Nandurbar | शहादा शहरात हेलिकॉप्टर किड्यांचं वादळ, नागरिक हैराण | NDTV Marathi
Swarm of 'helicopter insects' hits Shahada city; residents distressed.
शहादा शहरात सध्या हेलिकॉप्टर किड्यांच्या प्रादुर्भावाने थैमान घातले असून,यामुळे नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत.सायंकाळच्या वेळी अचानक किड्यांचे मोठे थवे शहरात दाखल होत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या किड्यांच्या तीव्र त्रासामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून,घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. या किड्यांच्या प्रादुर्भावामुळे रात्रीच्या वेळी दिवे सुरू ठेवणेही मुश्किल झाले आहे.