मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेनेच्या युतीला काठावरचे बहुमत मिळाल्याने वैधानिक समित्यांवरील बहुमत डळमळीत झाले आहे. यासाठी भाजप आणि शिंदेसेनेकडून अन्य पक्षांतील नगरसेवकांचा पाठिंबा मिळवण्याचे जोरदार प्रयत्न होत आहेत. हा पाठिंबा मिळाल्यास स्थायी समितीत उद्धवसेनेला फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यांचा एक सदस्य कमी होऊन सत्ताधारी पक्षाचा एक सदस्य वाढवण्याच्या हालचालींना वेग आला आहे.