टाळ, मृदुंग आणि माता रुख्मिणीचा गजर. हे दृश्य आहे अमरावतीच्या कौडण्यपूरचे माता रुख्मिणीच्या पालखीचे. महाराष्ट्रातील 431 वर्षाची परंपरा असलेली एकमेव अशी विदर्भाची ही रूक्मिणी मातेची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली.हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत आषाढी एकादशीसाठी ही पालखी मार्गस्थ झाली. या पालखीचं गावात ठिकठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने जल्लोषात स्वागत आणि पूजन करण्यात आले.33 दिवसाच्या पायदळ दिंडीसोबत शेकडो भाविक रवाना झाले आहेत.यावेळी महाआरती करून उपस्थित सर्व वारकऱ्यांनी रुक्मिणी मातेच्या पालखीला अत्यंत भावुक होऊन निरोप दिला. यावेळी पालखीचा नयनरम्य सोहळा पाहायला मिळाला.