मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीच्या कामाला वेग आलाय. आज शिवजयंती दिनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पुतळ्याची पायाभरणी करण्यात आली.राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे.राजकोट किल्ल्यावर यापूर्वी उभारलेला पुतळा कोसळल्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन या पुतळ्याचे स्ट्रक्चर पूर्णतः स्टेनलेस स्टीलचे असून ब्रॉन्झ धातू मधील हा पुतळा बनवला जात आहे.