राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरातील एका कार्यक्रमात पुन्हा एकदा महाविकास आघाडीला लक्ष्य करत गंभीर आरोप केले आहेत.लोकसभेत मविआने फेक नरेटिव्ह पसरवून विजय मिळवला होता.विधानसभेतही असाच विजय मिळेल असं त्यांना वाटत होतं.विधानसभेनंतर “मला आणि देवेंद्र फडणवीसांना तुरुंगात टाकून बर्फाच्या लादीवर झोपवून मारण्याचा मविआचा प्लॅन होता असा आरोप शिंदेंनी केलाय.विजयाची हवा मविआच्या डोक्यात गेली होती असंही शिंदेंनी म्हटलंय.