अभिनेता सलमान खानच्या घरात एकजण घुसल्याचा प्रकार समोर आला. वीस मे रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास ही व्यक्ती गॅलेक्सी अपार्टमेंट मध्ये घुसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणी आता घरात घुसणाऱ्या जितेंद्र कुमार सिंगच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. व्यक्ती छत्तीसगडची रहिवाशी असल्याचं कळतंय.