Unseasonal Rain In Maharashtra | पुढील दोन दिवसात 'या' 7 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा | NDTV

तब्बल 7 जिल्ह्यांना इशारा तर नाशिक, धुळे, जळगावात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता.राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढउतार बघायला मिळतोय. कधी थंडी तर कधी पाऊस अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक भागात थेट अवकाळी पावसाचा इशारा दिला. जोरदार वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्याला सुरूवात झाली असून या महिन्यात थंडी फार काही नसणार असल्याचे अगोदरच भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे. त्यामध्येच आता थेट अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला. काल राज्यात अनेक भागात धूसर वातावरण बघायला मिळाले. यासोबतच वायू प्रदूषणही चांगलेच वाढले होते. वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या. श्वास घेण्यासही समस्या होत आहे. सर्दी, खोकला आणि श्वसनासंबंधित समस्या अधिक जाणवत आहेत.

संबंधित व्हिडीओ