इराणच्या तीन अणूतळांवर अमेरिकेनं हल्ल्ला केल्यानंतर आता इराणनं इस्रायलवर ताबडतोड हल्ले केलेत.इस्रायलच्या तेल अवीव शहरावर इराणनं क्षेपणास्त्र डागलेत.इराणनं इस्रायलवर 27 क्षेपणास्त्र डागल्याची माहिती मिळतेय. हाईफा आणि तेल अवीव शहरावर दोन टप्प्यात इराणनं 27 मिसाईल डागलेत.पहिल्या टप्प्यात 22 तर दुसऱ्या टप्प्यात 5 मिसाईल डागण्यात आलेत. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणचा आक्रमक मोर्चा इस्रायलकडे वळला आहे. दुसरीकडे आता मध्य आशियातील अमेरिकेच्या सैन्य तळांवर इराण हल्ला करण्याची शक्यता आहे.त्यामुळे आता अमेरिकेची सैन्य तळ इराणच्या निशाण्यावर आहेत.इराणनं हल्ल्यासाठी अमेरिका आणि इस्रायलला जबाबदार ठरवत यूएनला पत्र पाठवलं आहे. इराणवरचा हल्ला हा अखंडता आणि सार्वभौमत्वावरचा हल्ला आहे असं इराणनं आपल्या पत्रात म्हटलंय.