Iran-Israelच्या युद्धात USची एन्ट्री,हे युद्ध कुठल्या दिशेनं जाणार? शैलेंद्र देवळाणकर यांचं विश्लेषण

Iran-Israelच्या युद्धात अमेरिकेची एन्ट्री,हे युद्ध कुठल्या दिशेनं जाणार? शैलेंद्र देवळाणकर यांचं विश्लेषण इराण आणि इस्रायलच्या युद्धात आता अमेरिकेनं उडी घेतली आहे. अमेरिकेनं इराणच्या 3 आण्विक तळांवर हल्ला चढवला आहे. इराणच्या आण्विक तळांवर हल्ला करत अमेरिकेनं फोर्डो,नतांज, इस्फाहन ही अणुतळं उद्ध्वस्त केली आहेत. इराणवरील हल्ल्ल्यात अमेरिकेनं B-2 बॉम्बचा हल्ला केलाय. दरम्यान इराणवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांनी संबोधित केलं. इराणनं हल्ले थांबवावे आणि शांतीचा मार्ग स्वीकारावा असं आवाहन डोनाल्ड ट्रम्प यांनी केलंय. शिवाय जर इराण थांबला नाही तर पुन्हा हल्ला करु असंही ट्रम्प म्हणाले. त्यामुळे आता अमेरिकेच्या एन्ट्रीनंतर आता हे युद्ध कुठल्या दिशेनं जाणार आहे हे पाहाणं महत्त्वाचं ठरेल.

संबंधित व्हिडीओ