वक्फ दुरुस्ती विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केल्यानंतर आता कायद्यात रूपांतरित झाले आहे.विधेयकाला राष्ट्रपतींची मान्यता मिळाली आहे.लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर, वक्फ दुरुस्ती विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने, वक्फ दुरुस्ती विधेयक आता कायद्यात रूपांतरित झाले आहे.आता हा कायदा संपूर्ण देशात लागू झाला आहे.दरम्यान नवीन कायद्याला काँग्रेस, एआयएमआयएम आणि आम आदमी पार्टीने वेगवेगळ्या याचिकांसह सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.संसदेच्या वरिष्ठ सभागृहात राज्यसभेत वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने १२८ तर विरोधात ९५ मते पडली.