पहिल्याच पावसात पिंपरी-चिंचवड शहरातले महत्त्वाचे भाग जलमय; नालेसफाईच्या कामावर प्रश्नचिन्ह | NDTV

पुणे जिल्ह्याकरता पुढील दोन तास रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. पुणे जिल्ह्यासह रायगड आणि रत्नागिरीमध्ये सुद्धा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलेला आहे. हवामान खात्यानं पुणे जिल्ह्याला ओरेंज अलर्ट जारी केल्यानंतर सकाळपासूनच जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात पावसाची संततधार सुरु आहे. पिंपरी चिंचवड शहरात देखील जोरदार पाऊस झाला असून अनेक ठिकाणी रस्त्यावरती पाणी साचलंय. शहरातील काळेवाडी भागामध्ये रस्त्यावरती पाणी साचल्यामुळे या गुडघर साचलेल्या पाण्यातून प्रवाशांना वाट शोधावी लागत होती. आणि या साचलेल्या पावसाच्या पाण्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी.

संबंधित व्हिडीओ