ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी नरकातला स्वर्ग या पुस्तकातून अनेक खळबळजनक दावे केलेत. पत्रा चाळ प्रकरणात संजय राऊत जेव्हा शंभर दिवसांसाठी तुरुंगात होते राऊतांनी नरकातला स्वर्ग हे पुस्तक लिहिलंय. या पुस्तकाचं उद्या संध्याकाळी प्रकाशन होणार आहे. प्रकाशनाच्या आधीच एनडीटीव्ही मराठीच्या हाती हे पुस्तक लागलंय. पुस्तकातल्या एका प्रकरणात बाळासाहेबांनी अमित शहांवर मोठे उपकार केल्याची कहाणी लिहिली आहे. गुजरात दंगल प्रकरणात जेव्हा अमित शहा अडकले होते त्यावेळी अमित शहांनी बाळासाहेबांकडे मदत मागितल्याचा दावा या पुस्तकातून करण्यात आलाय. तर दुसरीकडे शरद पवारांनी मोदींना केलेल्या मदतीचा त्यांना विसर पडल्याचंही राऊतांनी या पुस्तकात म्हटलंय.