Shivsena कुणाची?आज पुन्हा सुनावणी, सुनावणीपूर्वी राऊतांचा नि.आयोगावर आरोप | अभय देशपांडेंचं विश्लेषण

शिवसेना पक्ष आणि 'धनुष्यबाण' चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर सुनावणी थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होणार आहे...ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल युक्तिवाद करत आहे...आजही हा युक्तिवाद सुरू राहणार आहे...पक्षातील अंतर्गत बाबी किंवा चिन्हाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही, असा दावा वारंवार ठाकरे गटाच्या वकिलांकडून केला जात आहे...आज काय युक्तीवाद होणार याकडे लक्ष.निवडणूक आयोगाच्या माध्यमातून पाच हजार कोटी रुपयांना शिवसेना पक्षाचा सौदा झाला. ती किंमत एकनाथ शिंदेंनी मोजली असा दावा संजय राऊत यांनी केलाय. सुप्रीम कोर्टात सध्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा युक्तीवाद सुरु आहे. त्या सुनावणीसंदर्भात राऊतांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर ताशेरेही ओढले..

संबंधित व्हिडीओ