मेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या प्रचंड नाराज झाले जे युद्ध त्यांनी चोवीस तासांच्या आत थांबवण्याचा दावा केला होता ते रशिया युक्रेन युद्ध काही थांबलेलं नाही. जो मित्र आपलंच ऐकेल आणि युद्ध थांबवेल असं त्यांना वाटलं होतं तो त्यांचा मित्र पुतीन यांनी आपला हट्ट सोडलेला नाही त्यामुळे ट्रम्प प्रचंड संतापलेत आणि पुतीन यांच्या विरोधात त्यांनी आपला राग बोलूनही दाखवलाय सोशल मीडिया वर त्यांनी पुतीन यांना ठार वेडा म्हटलंय.