जाहिरात

"मुख्यमंत्रिपदाचा चेहरा देणार नाही",  उद्धव ठाकरेंची मागणी 'राष्ट्रवादी'च्या ज्येष्ठ नेत्याने धुडकावली

उद्धव ठाकरे यांनी स्वत: आधी मुख्यमंत्रिदाचा चेहरा ठरवा, असं जाहीर वक्तव्य महाविकास आघाडीच्या मेळाव्यात केलं होतं. मात्र महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केलं जात आहे.  

"मुख्यमंत्रिपदाचा चेहरा देणार नाही",  उद्धव ठाकरेंची मागणी 'राष्ट्रवादी'च्या ज्येष्ठ नेत्याने धुडकावली

रामराजे शिंदे, नवी दिल्ली

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाविकास आघाडीने तयारी सुरु केली आहे. जागावाटपाबाबत देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांचा बैठकांचा सिलसिला सुरु आहे. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल? याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. उद्धव ठाकरे यांनी स्वत: आधी मुख्यमंत्रिदाचा चेहरा ठरवा, असं जाहीर वक्तव्य महाविकास आघाडीच्या मेळाव्यात केलं होतं. मात्र महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केलं जात आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदाचा चेहरा देणार नाही, असं एका राष्ट्रवादीच्या नेत्याने म्हटले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या मागणीबाबत महाविकास आघाडीतील या ज्येष्ठ नेत्याने म्हटले की, “आम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा देणार नाही.” या नेत्याने असे म्हटल्याने महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवला जाणार नाही हे स्पष्ट झाले आहे. 

( नक्की वाचा - 'मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा', उद्धव ठाकरेंच्या मागणीमागचं राजकारण काय?)

काँग्रेस हायकमांडचाही नकार

उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस हायकमांडशी संपर्क साधून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आधी जाहीर करावा अशी मागणी केली होती, अशी सूत्रांची माहिती आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने ठाकरेंची ही मागणी नाकारली होती. महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीला सत्तेतून खाली खेचावे. महाविकास आघाडीचे सरकार येईल अशी परिस्थिती निर्माण व्हावी. तसं झाल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निश्चित केला जावा, असे काँग्रेस हायकमांडने उद्धव ठाकरेंना सांगितले होते.

(नक्की वाचा-  उद्धव ठाकरे यांचं शरद पवार, नाना पटोलेंसमोरच मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले...)

महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत चर्चेत असलेली नावे

महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांची नावे चर्चेत आहेत. या नेत्यांचे कार्यकर्ते याबाबत उघडपणे वक्तव्य करताना देखील दिसतात. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
शिवरायांच्या पायावर डोकं ठेवत मी माफी मागतो : PM नरेंद्र मोदी
"मुख्यमंत्रिपदाचा चेहरा देणार नाही",  उद्धव ठाकरेंची मागणी 'राष्ट्रवादी'च्या ज्येष्ठ नेत्याने धुडकावली
pm-narendra-modi-apologised-to-chhatrapati-shivaji-maharaj-on-statue-collapse-target-opposition-over-vinayak-damodar-savarkar
Next Article
शिवाजी महाराजांची माफी, सावरकरांचा उल्लेख, मोदींनी कसं बदललं राज्याचं राजकारण?