Rain Update : पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट

गेले चार दिवस पावसाचा जोर कमी झालेला असतानाच (Maharashtra Rain Update) आता पुन्हा कोकण, विदर्भाला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा देण्यात आला असून कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पाऊस झाला आहे. विदर्भातही पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. गेले चार दिवस पावसाचा जोर कमी झालेला असतानाच (Maharashtra Rain Update) आता पुन्हा कोकण, विदर्भाला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 5 दिवस हवामान खात्याने महाराष्ट्रासाठी 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. गुरुवारपासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे कोल्हापूरच्या धरणक्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढलाय. राधानगरी धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आले असून सध्या धरणातून 10 हजार क्यूसेक इतका पाणी विसर्ग सुरू आहे. 5 दिवसांपूर्वी राधानगरी धरणाचे 6 दरवाजे उघडले होते. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर यापैकी 4 दरवाजे बंद होऊन दोनच दरवाज्यामधून पाण्याचा विसर्ग सुरू होता. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत घट झाली होती. मात्र आता पुन्हा आज पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ शकते.

राधानगरी धरणाचे सात दरवाजे उघडले
गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापुरातील धरण क्षेत्रात पावसानं उसंत घेतली होती. मात्र कालपासून पुन्हा पावसान जोर धरला आहे. राधानगरी धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. धरण सध्या पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे. त्यामुळे आज सकाळी सात स्वयंचलित दरवाजे उघडलेत. सध्या धरणातून 10000 क्यूसेक इतका पाणी विसर्ग सुरू आहे. यापूर्वी 5 दिवसांपूर्वी 6 दरवाजे उघडले होते. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर यापैकी 4 दरवाजे बंद होऊन दोनच दरवाज्यामधून पाणी विसर्ग सुरू होता. यामुळे नद्याच्या पाणी पातळीत घट झालेली होती. मात्र आता पुन्हा पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ शकते.

Advertisement

आज पुणे शहराचं हवामान मुख्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. उद्यापासून शहरात पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा येथील घाट भागात: मध्यम/मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि उद्यापासून घाटातही पाऊस वाढू शकतो. त्यामुळे येत्या काही दिवसात घाटांवर जाणं टाळावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.


--