बेलापूर/नेरूळ–उरण मार्गावरील प्रवाशांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. रेल्वेने दिलेले आश्वासन पूर्ण करत सोमवार या मार्गावर आणखी 5 अतिरिक्त रेल्वे फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे या मार्गावरील एकूण गाड्यांची संख्या 40 वरून 50 होणार आहे. प्रवाशांची गर्दी कमी होऊन प्रवासाचा वेळ वाचणार आहे.उरण मार्गावर 50 ट्रेन्स धावणार आहेत. ही मोठी गोष्ट समजली जाते. विशेष म्हणजे या मार्गावर 100 कोटी खर्च करून तयार करण्यात आलेलं 'तारघर' स्टेशन सुरू होणार आहे. नवी मुंबई एअर पोर्ट सुरू झाल्यानंतर इथे राहाणाऱ्या लोकांची संख्याही वाढणार आहे.
अतिरिक्त गाड्यांसोबतच, या मार्गावर दोन नवी रेल्वे स्थानकं ही सुरू केली जाणार आहे. त्यात तारघर (Targhar) आणि गव्हाण (Gavan) ही 2 नवीन स्टेशन्सही कार्यान्वित होत आहेत. तारघर हे महत्त्वचे स्टेशन समजले जाते. तारघर हे स्टेशन थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Navi Mumbai International Airport) जवळ आहे. त्यामुळे विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही मोठी सोय ठरणार आहे.
गव्हाण स्टेशन सुरू झाल्यामुळे स्थानिक प्रवाशांचा उपनगरीय रेल्वेचा प्रवास अधिक सोपा होईल. नव्या लोकल गाड्यांमुळे लोकलचे वेळापत्रक बदलले जाणार आहे. त्यानुसार आता उरण मार्गावर प्रवाशांना रात्री उशिरापर्यंत सेवा मिळणार आहे.
- उरणहून: पहिली ट्रेन 05:35 ला, तर शेवटची ट्रेन रात्री 22:05 ला.
- बेलापूरहून: शेवटची ट्रेन रात्री 22:15 पर्यंत उपलब्ध असेल.
या नवीन गाड्या आणि विस्तारित वेळेमुळे प्रवाशांचा प्रवास आता जलद आणि अधिक सोयीचा होणार आहे. वाढलेल्या सेवा, विशेषतः पीक-अवर (Peak-hour) मध्ये वाढलेली वारंवारता आणि विस्तारित सेवा वेळ यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक जलद, सुरळीत आणि सोयीस्कर होणार आहे. प्रवाशांनी याची नोंद घेऊन त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
नक्की वाचा - Lionel messi: 100 कोटींचं जेट, 100 कोटींचं घर!, लियोनेल मेस्सीची एकूण संपत्ती किती?
A promise fulfilled.
— Central Railway (@Central_Railway) December 14, 2025
From tomorrow 5 additional pairs of trains will ply between Belapur/Nerul–Uran section also 2 new stations Targhar and Gavan on Uran lines will be operationalised.
• Targhar – Located near the upcoming Navi Mumbai International Airport will add significant…
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world