Rain Update : शुक्रवारची सकाळ काळ्या ढगांनी, मुंबईत मुसळधार तर कोकणाला रेड अलर्ट

कोकणात पावसाचं धुमशान सुरू असून आज रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Ratnagiri Red Alert)

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

18 जुलैला मुंबई आणि उपनगरातील काही भागात मुसळधार (Maharashtra Rain Alert) पाऊस बरसत होता. त्यानंतर आजही 19 जुलै रोजी मुंबईत सकाळपासून काळे ढग पाहायला मिळाले. कोकण-पश्चिम किनारपट्टीवर काही ठिकाणी मुसळधार-अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यात पुढील दोन दिवस असच वातावरण राहिलं तर सुट्टीच्या दिवशी शनिवार-रविवार पर्यटक मोठ्या संख्येने बाहेर पडण्याची शक्यता आहे. 

मुंबई आणि परिसरात गुरुवारी हवामान खात्याने तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळतील असा अंदाज वर्तवला होता. गुरुवारी पावसाने शहर तसेच उपनगरांत पहाटेपासून जोरदार हजेरी लावली. दरम्यान, शुक्रवारी मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. शहरात तसेच उपनगरांत गुरुवारी पहाटेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. 

मलबार हिल, चर्चगेट, कुलाबा, नरिमन पॉइंट तसेच उपनगरातील बोरीवली तसेच कोकणात देखील पाऊस दमदार हजेरी लावेल असा अंदाज दर्शवण्यात आला आहे. मुंबईत देखील सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. कोकणात गेल्या अनेक दिवसांपासून तुफान पाऊस सुरू आहे. आजही हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्यांनी अधिक सावध राहण्याची आवश्यकता आहे. 

नक्की वाचा - 'त्या' तिन्ही पुजाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, मुख्यमंत्र्यांकडे महिला आमदाराची मागणी

विदर्भातही पावसाचं धुमशान...
विदर्भात पुढील दोन दिवस मुसळधार तसेच अती मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आज शुक्रवारी विदर्भात ढगाळ वातावरण राहणार असून पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत अतिवृष्टीचा रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. या जिल्ह्यातील कित्येक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी वारे आणि मुसळधार किंवा अति मुसळधार पाऊस तसेच काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. नागपूर, वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यात  ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. या जिल्ह्यात कित्येक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मुसळधार ते अति मुसळधार वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

Advertisement

यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह किरकोळ ते मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. विदर्भात अन्यत्र पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय विदर्भात कमाल तापमान 27 ते 32 डिग्री दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तर किमान तापमान 23 ते 25 असण्याचा अंदाज आहे. यवतमाळ जिल्ह्याचे किमान तापमान विदर्भात सर्वांत कमी 18 डिग्री असू शकेल.