
Mumbai News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांमध्ये एकजूट आणण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मनसेच्या मेळाव्यात आपआपसातील मतभेद बाजूला ठेवून येणाऱ्या निवडणुकांसाठी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन राज ठाकरे यंनी केले आहे. या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना मुंबईची सत्ता काबीज करण्याचे स्पष्ट लक्ष्य दिले आहे.
'आम्ही २० वर्षांनी एकत्र येऊ शकतो'
सूत्रांच्या माहितीनुसार, राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना, "वीस वर्षांनी आम्ही दोघे एकत्र येऊ शकतो, तुम्ही एकत्र येऊन काम करा" असे भावनिक विधान केले. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना सुरुवात झाली आहे. पक्षातील गटबाजी आणि अंतर्गत वाद दूर करून कार्यकर्त्यांनी एकाच दिशेने काम करावे, असा संदेश दिला.
(नक्की वाचा- Raj Thackeray vs Nishikant Dubey: मराठी vs हिंदी मुद्दा पेटला; भाजपचे निशिकांत दुबे पुन्हा बरळले, मनसेचा थेट इशारा)
राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीच्या तयारीला तातडीने लागण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या भागातील मतदार यादीची पडताळणी करावी आणि त्यावर लक्ष केंद्रित करावे. पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे.
(नक्की वाचा- 'चीनने जमिनीवर कब्जा केला हे तुम्हाला कसं कळलं? देशभक्त असता तर...'; राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं)
मराठीच्या मुद्द्यावर अभ्यास करा
मराठीचा मुद्दा मांडण्यासाठी योग्य पद्धतीने काम करावे. कोणत्याही व्यक्तीला चुकीच्या पद्धतीने मारहाण करू नये, असेही स्पष्ट निर्देश राज ठाकरे यांनी दिले आहे. राज ठाकरे यांच्या या आदेशामुळे आता मनसे कार्यकर्ते मुंबईसह राज्यात सक्रिय होण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world