लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचा प्रचार संपण्यास आता 24 तासांपेक्षा कमी कालावधी उरलाय. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मुंबईमध्ये हाय व्होल्टेज सभा झाल्या. शिवाजी पार्कमध्ये झालेल्या महायुतीच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.
आमच्याकडं 10 वर्षांचा रिपोर्टकार्ड आहे. तसंच 25 वर्षांचा रोडमॅप आहे. विरोधकांकडं काय आहे? असा सवाल करत पंतप्रधानांनी विरोधकांना लक्ष्य केलं. त्याचबरोबर सावकरांचा अपमान करणार नाही हे राहुल गांधींकडून वदवून घ्या असं आव्हान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला दिलं.
मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
. शिवतिर्थावरील या जमीनीवर बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भाषणाचे हुंकार उमटले. ही मंडळी सत्तेसाठी दिवसरात्र सावरकरांना दिवस-रात्र शिव्या देणाऱ्या लोकांसोबत गेली आहेत. निवडणूक संपताच राहुल गांधी सावरकरांवर टीका करण्यास सुरुवात करतील.
शिवसेनेची ओळख ही घुसखोरांच्या विरोधात उभी राहणारी संघटना अशी होती. आज नकली शिवसेना CAA ला विरोध करत आहे. आपल्या देशात नकली सेनेइतकं मतपरिवर्तन कोणत्याही पक्षाचं झालेलं नाही. ज्या कसाबनं मुंबईवर हल्ला केला, त्यांना ही लोकं क्लिन चीट देत आहेत. पाकिस्तानची जगात कुणीही ऐकत नाही. हे आघाडीचे नेते पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. बाबासाहेब आंबेडकर धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याच्या विरोधात होते. संविधान सभेचं यावर एकमत होतं. या मंडळींना दलित, आदिवासी, ओबीसी यांचं आरक्षण हिसकावून घ्यायचं आहे.
यंदाची निवडणुकीचे निकाल सर्व रेकॉर्ड तोडणारे असतील, असा विश्वास पंतप्रधानांनी त्यांच्या सभेत व्यक्त केला.
पंतप्रघान नरेंद्र मोदींचे भाषण सुरु
शिवाजी पार्कमधील महायुतीच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरु झाले आहे.
'मुंबई हे शहर फक्त स्वप्न पाहात नाही तर ते स्वप्न जगणारं शहर आहे. काही करण्याचा संकल्प घेऊन चालणाऱ्या लोकांना मुंबईनं कधी निराश केलं नाही. या ड्रिम सिटीमध्ये मी तुमच्यासमोर 2047 चं ड्रिम घेऊन आलो आहे. आपल्या सर्वांना मिळून विकसित भारत बनवायचा आहे. त्यामध्ये मुंबईची मोठी भूमिका आहे.'
'भारताबरोबर स्वतंत्र झालेले देश आपल्यापुढं निघून गेले. आपण त्यांच्यापेक्षा कमी होतो का? त्या सरकारमध्ये कमतरता होती. त्यांनी भारतीयांच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला नाही.'
राज ठाकरेनी मोदींकडं काय मागितलं?
महायुतीच्या सभेत राज ठाकरेंनी काही गोष्टींची पंतप्रधानांकडं मागणी केली.
1) मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा2) मराठा साम्राज्याचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात मुलांना शिकवावा
3) गड किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांची खरी स्मारकं. या गडकिल्ल्यांना पूर्वीचं वैभव मिळवून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची समिती नेमावी
4) मुंबई-गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करावा
'तुम्ही होता म्हणून राममंदिर झालं'
जे सत्तेत येणार नाहीत. त्यांच्याबद्दल आपण का बोलतो - राज ठाकरे
1990 च्या दशकात अयोध्येत जे घडलं ते चित्र माझ्या डोळ्यासमोरुन गेलं नाही. - राज
'आपण होता म्हणून राममंदिर झालं, अन्यथा झालंच नसतं,' राज ठाकरे यांनी मानले मोदींचे आभार
पंतप्रधान मोदींनी ट्रिपल तलाक कायदा रद्द केला. - राज ठाकरे.
इतकं वर्ष जे झालं नाही ते करुन घेणं हे धाडसाचं - राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाषण सुरु
शिवाजी पार्कमधील महायुतीच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाषण सुरु आहे.
रामदास आठवले यांचे विरोधकांना चिमटे
शिवतीर्थावर आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये बोलताना रामदास आठवले यांनी कवितेच्या माध्यमातून विरोधकांना चिमटे काढले.
शिवतीर्थावर आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये बोलताना रामदास आठवले यांनी कवितेच्या माध्यमातून विरोधकांना चिमटे काढले.#Election #Maharashtra #Loksabhaelction24 pic.twitter.com/7acjbeWE6A
— NDTV Marathi (@NDTVMarathi) May 17, 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी सभास्थळी दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवाजी पार्कमधील महायुतीच्या सभेच्या ठिकाणी दाखल झाले आहेत. पंतप्रधानांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन.
मुख्यमंत्र्यांची 'उबाठा' पक्षावर टीका
'बाळासाहेब ठाकरेंचा मताधिकार 6 वर्षांसाठी काँग्रेसनं काढला. आता माझं मत काँग्रेसला', मुख्यमंत्र्यांचा उबाठा पक्षाला टोला.
आमच्याकडे शिवसेना तर तुमच्याकडं शिव्यासेना आहे - मुख्यमंत्री
बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक जीव गेला तरी काँग्रेसला मत देणार नाही. - मुख्यमंत्री
तुम्ही पाकिस्तानची बोली बोलत आहात. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी तुमच्या रॅलीत फिरतो. तुमच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे फडकतायत. - मुख्यमंत्री
1993 मधील बॉम्बस्फोट आठवा. 26/11 चा हल्ला आठवा. मुंबईत शेकडो जणांचे बळी गेले. तुम्ही त्यांच्यासोबत जाताय? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
मोदींच्या कार्यकाळात मुंबईत एकही बॉम्बस्फोट झाला नाही. मुंबईत काही झालं तर 'मोदी घुसके मारे गा' हे पाकिस्तानला माहिती आहे. - मुख्यमंत्री
मोदींशिवाय हा देश कुणी चालवू शकत नाही. हे देशातील जनतेलाही माहिती आहे. - मुख्यमंत्री
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरु
शिवाजी पार्कमधील महायुतीच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरु झालं आहे.
मुंबईकरांसाठी केलेलं काम दाखवा
'इंडी आघाडीच्या नेत्यांनी मुंबईसाठी केलेलं एक काम दाखवावं', देवेंद्र फडणवीस यांचं आव्हान.
कोरोना व्हायरसच्या काळात मोदीची लस देत होते. त्यावेळी उद्धवजींच्या काळात मुंबईत खिचडीचा घोटाळा सुरु होता.- फडणवीस
निवडणूक आली की नवे जुमले सांगितले जातात - फडणवीस
इंडी आघाडी अजमल कसाबसोबत आणि आम्ही उज्जवल निकमसोबत - फडणवीस
फडणवीसांकडून बाळासाहेबांचं स्मरण
शिवाजी पार्कमधून भाषण करताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण होते. इंडी आघाडीच्या दबावातून उद्धव ठाकरे यांनी 'माझ्या तमाम हिंदू बांधवांनो' ही भाषा सोडली, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
देवेंद्र फडणवीस यांचं भाषण सुरु
शिवाजी पार्कमधील महायुतीच्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण सुरु
विरोधकांना जागा दाखवा - अजित पवार
पंतप्रधानांनी संविधान दिन सुरु केला. विरोधकांकडून संविधान बदलण्याचा प्रचार सुरु आहे. मतदान करुन विरोधकांना जागा दाखवा, अजित पवारांचं मतदारांना आवाहन
विरोधकांचा केविलवाणा प्रयत्न - अजित पवार
विरोधकांकडे विकासाचा मुद्दा नाही. विरोधकांकडून नको ती भाषणं करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे, अजित पवार यांचा टोला.
उपमुख्यमंत्री अजित पवारांचं भाषण सुरु
शिवाजी पार्कमधील महायुतीच्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाषण सुरु आहे.
दलित समाजामध्ये गैरसमज करण्याचं काम राहुल गांधी करत आहेत. संविधानाला हात लागणार नाही. रामदास आठवले यांचं सभेत वक्तव्य
रामदास आठवलेंचं भाषण सुरु
शिवाजी पार्कमधील महायुतीच्या सभेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं भाषण सुरु झालंय.
मुख्यमंत्री -उपमु्ख्यमंत्री सभास्थळी दाखल
शिवाजी पार्कमध्ये महायुतीची सभा थोड्याच वेळात सुरु होईल. या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सभास्थळी दाखल झाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील उपस्थित आहेत.
महायुतीच्या सभेपूर्वी फडणवीस- राज यांची भेट
मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये होणाऱ्या महायुतीच्या सभेपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील यावेळी उपस्थित आहेत.
मुंबईच्या 6 मतदारसंघातील प्रमुख लढती
मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार कोण आहेत हे पाहूया...
दक्षिण मुंबई - यामिनी जाधव (शिवसेना) विरुद्ध अरविंद सांवत (ठाकरे गट)
ईशान्य मुंबई- मिहीर कोटेजा (भाजप) विरुद्ध संजय दिना पाटील (ठाकरे गट)
दक्षिण मध्य - राहुल शेवाळे (शिवसेना) विरुद्ध अनिल देसाई (ठाकरे गट)
उत्तर मुंबई - पियुष गोयल (भाजप) विरुद्ध भूषण पाटील (काँग्रेस)
उत्तर मध्य मुंबई - उज्जल निकम (भाजप) विरुद्ध वर्षा गायकवाड (काँग्रेस)
उत्तर पश्चिम - रविंद्र वायकर (शिवसेना) विरुद्ध अमोल कीर्तिकर (ठाकरे गट)
पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देणार आहेत. पंतप्रधानांच्या सभेच्या निमित्तानं शिवाजी पार्कवर कडेकोट बंदोबस्त करण्यात आलाय.