जाहिरात

'राजकारणात एक संत, ते म्हणजे शरद पवार, त्यांनी...' राज ठाकरे पुन्हा थेट भिडले

या राज्यात जातीजातीत कधी नव्हता येवढा सध्या द्वेष निर्माण झाला आहे. त्याला जबाबदार हे शरद पवारच आहेत.

'राजकारणात एक संत, ते म्हणजे शरद पवार, त्यांनी...' राज ठाकरे पुन्हा थेट भिडले
यवतमाळ:

मनसे प्रमुख राज ठाकरे हे सध्या विदर्भात प्रचार करत आहे. यवतमाळ जिल्ह्यात त्यांची पहिली सभा झाली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष केले. या राज्यात जातीजातीत कधी नव्हता येवढा सध्या द्वेष निर्माण झाला आहे. त्याला जबाबदार हे शरद पवारच आहेत. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राची ओळख पुसली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या या राज्यात अशा गोष्टी घडत आहे याचा कुठे तरी विचार व्हायला हवा असे राज ठाकरे यावेळी म्हणाले. त्यांनी यासभेत लाडकी बहीण योजनेचाही समाचार घेतला. शिवाय नवी लोकं निवडून देणार नाही तो पर्यंत बदल होणार नाही असेही त्यांनी सांगितले. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

2014 मध्ये मनसेने सर्वात आधी महाराष्ट्राचा विकास आरखडा मांडला होता.  प्रश्न कसे सुटतील ते कोणी बोलत नव्हते. ते मनसेने केलं. पण आपल्याला जाती पातीत गुंतवलं गेलं. प्रत्येकाची ओळख जातीमध्ये होवू लागली.  जाती आधी पण होत्या. जातींशी मला देणंघेणं नाही. सध्या स्वताच्या जातीबद्दल प्रेमा पेक्षा, दुसऱ्याच्या जाती बद्दल द्वेष पेरला जात आहे. असं या महाराष्ट्रात कधी झालं नाही. हे आताच सुरू झाले. आपल्याकडे एक संत जन्माला आलेत. ते म्हणजे शरद पवार. त्यांनीच हे जातीपातीचं विष राज्यात कालवलं आहे. त्याला जबाबदार तेच आहेत असा हल्लाबोल पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी केला. 

ट्रेंडिंग बातमी - जरांगे यांनी उमेदवार का दिले नाहीत? आदल्या रात्री पडद्यामागे काय घडलं?

या निमित्ताने त्यांनी लाडक्या बहीण योजनेचाही समाचार घेतला. लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला मिळाले असतील. पण त्यातून तुमच्या हाताला काही लागणार नाही. असा फुकटच्या योजना बंद केल्या पाहीजे. आमचे सरकार आल्यास फुकटचे काही देणार नाही असे राज म्हणाले. त्या ऐवजी महिलांच्या हाताला काम देईन. त्यांना सक्षम बनवेन असे राज ठाकरे म्हणाले. विदर्भात आधी ज्या समस्या होत्या, त्याच समस्या आजही आहेत. काही बदलेलं नाही. यवतमाळची ओळख ही आत्महत्या करणाऱ्यांचा जिल्हा अशी झाली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - पहिल्याच सभेत उद्धव ठाकरेंच्या 3 मोठ्या घोषणा, विरोधकांवरही तुटून पडले

ही स्थिती बदलणार आहे का? या जिल्ह्याचे दोन दोन मुख्यमंत्री झाले. पण जिल्ह्याचं चित्र काही बदललं नाही. ज्या वेळी तुम्ही नव्या लोकांना निवडून द्याल त्याच वेळी जिल्ह्याचे चित्र बदलेल असे राज यावेळी म्हणाले. गेल्या पाच वर्षात काय राजकारण झालं हे फक्त आठवून बघा. निवडणूका आल्या की हुल्लडबाजी सुरू होते. पैसे तुमच्या थोबाडावर फेकले जाता. मग आम्ही खूष होती. आम्ही लाचार होतो. तुम्हाला त्याचं काही वाटत नाही. ज्यांनी तुमची वाट लावली त्यांनाच मग आम्ही मत देतो.  आपण दिलेलं मत कुठे विकलं गेलं आहे हे पाहा. तुम्ही निवडून दिलेली माणसं विकली जाणार. तुम्ही हा तमाशा बघत राहाणार. पुन्हा निवडणुका येणार. त्यांनाच तुम्ही मतदान करणार. नंतर तुम्हीच  आत्महत्या करणार. अशा शब्दात राज ठाकरे यांनी मतदारांनाही सुनावलं. शिवाय अशा स्वाभिमान्य शुन्य लोकांचे मला नेतृत्वच करायचं नाही असे म्हणत, आता तरी जागे व्हा असं आवाहन त्यांनी केलं.