विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तास शिल्लक आहेत. त्या आधी कालिचरण बाबांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यातील वातावरण तापलं आहे. हिंदूत्व तोडणारा राक्षस अशी टीका कालिचरणबाबांनी मनोज जरांगे पाटील यांचे नाव न घेता केली होती. पण मराठा आरक्षणाचा नेता असा उल्लेख त्यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्याबाबत मराठा समाजात मोठी नाराजी निर्माण झाली आहे. हे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाट यांच्या मतदार संघात करण्यात आले. त्यामुळे शिरसाट यांची धावाधाव झाली आहे. त्यांनी तातडीने जरांगे यांची भेट घेतली. शिवाय जरांगे यांनी कालिचरण यांचा उल्लेख टिकली लावणारा बाबा असा केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मराठा आरक्षण आंदोलनाचा मोठा असर मराठवाड्यात दिसत आहेत. त्यात कालिचरण बाबा यांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये एक सभा घेतली. ही सभा शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाट यांच्या मतदार संघात झाली. यावेळी बोलताना त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना थेट लक्ष्य केले. मराठा आरक्षणाचा नेता असा उल्लेख करत ते हिंदूत्व तोडणारा राक्षस असा उल्लेख केला. थेट मनोज जरांगेबाबत असं वक्तव्य केल्याने मराठा समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्याला जरांगे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी कालिचरण बाबांचा उल्लेख टिकलीवाला बाबा असा केला आहे. हा बाबा सुपाऱ्या पैसे, नारळ घेतात. वाकडी टिकली लावलेले स्वत:ला हिंदू धर्माचे रक्षक समजतात. पण धर्माची खरी रक्षक ही जनताच आहे असंही ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - "माझी चूक झाली, मला इथून सोडवा, विनोद तावडेंचा फोन", हिंतेंद्र ठाकूरांचा दावा
या बाबाला आरक्षणाबाबत बोलण्याची काही गरज नव्हती. आरक्षण आणि बाबांचा काय संबंध येतो. या बाबाने बरच सांगितलं, बाबांनी आम्हाला वारकरी संप्रदायाचे संस्कार शिकवले पाहिजे हे त्यांचं काम आहे. आरक्षण काय,हे शिकवण त्यांचं काम नाही असं ही ते म्हणाले. हा विचित्र प्राणी आहे. तू का बाबा आहे का ? माझ्या आई बहिणीवर हल्ला झाला होता, तेव्हा तू कुठे गेला होता.? असा प्रश्नही त्यांनी केला. टिकल्या लावतो, गंध लावतो, नथ घालतो. हिंदू धर्मावर ज्यावेळी संकट येत तेव्हा आम्ही समोर येतो. अशा शब्दात जरांगे यांनी बाबाला सुनावले आहे.
दरम्यान यानंतर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाट यांची चांगलीच धावपळ झाली आहे. कारण याबाबांची सभा त्यांच्याच मतदार संघात झाली होती. या सभेशी आपला काही संबंध नाही असं शिरसाट यांनी सांगितलं आहे. मी त्यांना काही बोलावलं नव्हतं असंही ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी थेट मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीत सामाजीक आणि राजकीय चर्चा झाल्याचे जरांगे म्हणाले. समाजाला आरक्षणाची गरज आहे असंही ते म्हणाले. शिवाय तुम्ही सत्तेत होता त्यावेळी आरक्षण का दिलं नाही अशी विचारणाही जरांगे यांनी यावेळी शिरसाट यांना केली. आम्हाला फक्त आश्वासनं दिली जातात असंही ते म्हणाले.
लोकसभेला जे सांगितलं आहे तेच विधानसभेला सांगितलं आहे. मतदानाला जाताना स्वतःच्या पोराला पोरीला विचारून मतदान केंद्रावर जा.नेत्यांच्या बाजूने,पक्षाच्या बाजूने की आरक्षणाच्या बाजूने मतदान करू हे पोरांना विचारा, तुम्ही जर आरक्षणाला विरोध करणारे पाडले नाही तर तुमची मुलं मोठे होणार नाही असंही जरांगे यावेळी म्हणाले. शिवाय आपण कोणालाही पाठिंबा दिलेला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world