जाहिरात

मविआ की महायुती? सत्ता कोणाची येणार? निवडणूक विश्लेषक अक्षर गोयल यांचं भाकित काय?

राज्यात सत्ता कोणाची येणार? सध्याची हवा कोणाच्या बाजूने आहे? याबाबत निवडणूक विश्लेषक अक्षर गोयल यांनी काही भाकितं वक्त केली आहे.

मविआ की महायुती? सत्ता कोणाची येणार? निवडणूक विश्लेषक अक्षर गोयल यांचं भाकित काय?
मुंबई:

विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. त्यात उमेदवार ही जाहीर झाले आहेत. अशा वेळी राज्यात सत्ता कोणाची येणार?  सध्याची हवा कोणाच्या बाजूने आहे? याबाबत निवडणूक विश्लेषक अक्षर गोयल यांनी काही भाकितं वक्त केली आहे. NDTV मराठीनं 'महाराष्ट्राचा जाहीरनामा' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात अक्षर गोयल सहभागी झाले होते. त्या वेळी बोलताना त्यांनी सध्या मविआ की महायुती याबाबतही काही संकेत दिले आहेत. त्या मागची काही गणितही त्यांनी यावेळी मांडली आहेत.      

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

निवडणुकाचं सर्वे केले जातात. असे सर्वे झाले पाहीजेत असे मत यावेळी अक्षर यांनी व्यक्त केलं. पण हे सर्वे केवळ निवडणुकीं पुरताच न होता ते दर वर्षी केली पाहीजेत. त्यातून सरकारची कामगिरी ही दिसून येते. शिवाय सरकारवही चांगले काम करण्याचा दबाव येतो असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणूका होत आहेत. ही आतापर्यंतची सर्वात  वेगळी निवडणूक आहे. ही अशी निवडणूक आहे ज्यात मतदार सर्वात जास्त संभ्रमात आहेत अस वक्तव्य यावेळी अक्षर गोयल यांनी केले. 

ट्रेंडिंग बातमी - NDTV Conclave:'आम्ही ठाकरेंच्या डिझाईनला बळी पडलो' प्रकाश आंबेडकर थेट बोलले

राज्यात सहा पक्ष आहे. त्यामुळे कोणाचा कोणता पक्ष? सध्या कोण कोणत्या पक्षात आहे? तो आधी कुठे होता या आणि या सारख्या अनेक गोष्टी मुळे मतदार हे संभ्रमीत झाले आहेत असेही ते म्हणाले. त्यामुळे मतदान नक्की कोणाला करायचं याबाबत त्यांच्या मनातही शंका आहे. त्याचा परिणाम ही निकालावर होऊ शकतो असेही त्यांनी स्पष्ट केले. या निवडणुकीत काँग्रेसला जागा वाटपात 150 जागा मिळायला हव्या होत्या असंही ते म्हणाले. काँग्रेसचे संघटन संपूर्ण राज्यात आहे. मागिल वेळी ही काँग्रेसने जास्त जागा जिंकल्या होत्या. त्या तुलनेत यावेळी मिळालेल्या जागा या कमी असल्याचे गोयल म्हणाले.  

ट्रेंडिंग बातमी - विधानसभेत महायुती किती जागा जिंकणार? फडणवीसांचा आकडा काय?

त्याचा फटका काँग्रेसला बसू शकतो. सध्याच्या जागा वाटपात काँग्रेसला 50 जागा या कमी मिळाल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे त्याचा थेट फटका काँग्रेस आणि महाविकास आघाडीला बसू शकतो असे ते म्हणाले. त्यामुळे या गोष्टीची महाविकास आघाडीला काळजी घ्यावी लागणार आहे. लोकसभा निवडणूक आणि विधानसभा ही वेगळी असते. त्याचे मुद्दे ही वेगळे असतात. 

ट्रेंडिंग बातमी - NDTV Conclave LIVE : पंकजा मुंडेंना या चार मुद्द्यांवर करायचंय काम; सत्तेत आल्यानंतर पहिला निर्णय काय घेणार?

विधानसभा निवडणुकीत स्थानिक मुद्दे हे महत्वाचे ठरणार असल्याचे गोयल म्हणाले. सध्याच्या स्थिती मुस्लिम मते किती प्रमाणात शिफ्ट होतील हे सांगणे कठीण आहे. पण काही मतदार संघात तसे होवू शकते. मात्र लोकसभे प्रमाणेच यावेळीही मुस्लिम मते एकाच ठिकाणी जातील असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्याच्या स्थिती महाराष्ट्राची विधानसभा निवडणूत ही अत्यंत चुरशीची आहे. ग्रामिण भागातील मतदान हे निर्णायक ठरणार आहे असेही गोयल म्हणाले. लोकसभेला महायुतीला ग्रामिण भागातच जास्त फटका बसला होता. 

ट्रेंडिंग बातमी - Maharashtracha Jahirnama : 'जरांगे फॅक्टर' मराठवाड्यातल्या एक-दोन जिल्ह्यात मर्यादित, छगन भुजबळांचं टीकास्त्र

यावेळी मात्र लाडकी बहीण योजना आणली गेली आहे. त्याच परिणाम निवडणुकीत दिसेल. जर ही योजना लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचवली गेली तर त्याचा फायदा महायुतीला होण्याची दाट शक्यता आहे. शहरी भागात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची कामगिरी चांगली होती. विधानसभेलाही ती चांगली राहण्याची शक्यता आहे. पण ग्रामिण भागात महायुती कशा पद्धतीने कामगिरी करते यावर महाराष्ट्रातले निकाल अवलंबून असतील असे त्यांनी स्पष्ट केले. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com