मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुण्यात पहिली सभा घेतली. या सभेत त्यांनी महाविकास आघाडी बरोबरच महायुतीतल्या नेत्यांनाही लक्ष्य केलं. गेल्या पाच वर्षात राजकारणाच खेळ करून ठेवला आहे. कोणालाच कोणाचा पायपोस नाही अशी टीका राज ठाकरे यांनी केली. असं घाणेरडं राजकारण या आधी महाराष्ट्रात कधीच झालं नव्हतं असंही ते म्हणाले. आमचं मराठीपण आम्ही सोडू दिलं नाही. मी ते कधीही सोडणार नाही. असं सांगताना त्यांनी मी हिंदू म्हणून जेवढा कडवट तेवढा मराठी म्हणून कडवट आहे असे त्यांनी कसब्याच्या सभेत सांगितलं. शिवाय त्यांनी या सभेत अजित पवारांची मिमिक्री,एकनाथ शिंदेची नक्कल करून दाखवली. शिवाय मराठी पाठ्या कशा बदलायला लावल्या याचा किस्साही सांगितला. मशिदीवरचे भोंगे काढणार म्हणजे काढणार असेही त्यांनी यासभेत सांगितले.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युती म्हणून लढले. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी म्हणून लढले. लोकांनी युतीला स्पष्ट बहुमत दिले. पण त्याच वेळी एक पहाटेचा शपथविधी झाला. तो काही तास टिकला. काकांनी डोळे वटारल्यावर अजित पवार परत आले. यावेळी त्यांनी अजित पवारांची मिमिक्री केली. अजित पवार बोलताना कधीच पुर्ण विराम, अर्ध विराम देत नाहीत असं सांगित त्यांची मिमिक्री त्यांनी केली. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. ते अडीच वर्ष मुख्यमंत्री होते. त्यातले सव्वा एक वर्ष ते बाहेर आलेच नाहीत. कोणाला भेटलेच नाहीत. मग एकनाथ शिंदे त्यांच्या ढेंगे खालून चाळीस आमदार घेवून सुरतला गेले. हा सर्व घटना क्रम राज यांनी या सभे वेळी सांगितला.
ट्रेंडिंग बातमी - शिवसैनिकाची बोटे छाटली, ठाकरेंनी त्यालाच स्टेजवर आणलं, पुढे काय झालं?
यातून तुम्हाला सर्वांनी गृहीत धरलं आहे. तुमचं मत कुठे फिरत आहे हेच तुम्हाला आता शोधावे लागत आहे. शिंदे आमदार घेवून गेले. अजित पवारांबरोबर मांडीला मांडी लावून बसणे आम्हाला पटलं नाही. त्यामुळे आम्ही बाहेर पडलो असे शिंदेंनी सांगितले. यावेळी त्यांनी शिंदेंचीही नक्कल केली. काही महिने होत नाही. तर त्याच मांडीवर जावून अजित पवार बसले. या राजकारणाला काय म्हणायचे असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थिताना केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं की 70 हजार कोटीचा घोटाळा करणाऱ्याला जेलमध्ये पाठवणार. हा आरोप केल्यानंतर दहा दिवसात त्याच अजित पवारांना त्यांनी उपमुख्यमंत्री केलं. या सर्व राजकारणाची चिड तुम्हाल येत नाही का? असा प्रश्न त्यांनी यावेळी केला.
ट्रेंडिंग बातमी - 'मोदी गॅरंटी नाही तर राज्यात फक्त ठाकरे गॅरंटी' उद्धव गरजले, मोदी- शाहंना सुनावले
मनसेने अनेक आंदोलने केले. त्यामुळे मोबाईलवर मराठी ऐकू येतं. हे कोणत्याच पक्षाला किंवा सरकारला सुचलं नाही. कारण त्यांना त्याची गरज वाटली नाही. पण कोणतीही सत्ता नसताना मनसेने हे करून दाखवले. मराठी पाट्यांचे आंदोलनही मनसेने केले. सभे ठिकाणी आयसीआयसीआय बँकेची शाखा होती. त्याच्या वरील पाटी ही मराठीत होती. त्याचा उल्लेख करताना राज यांनी यांना जेव्हा आम्ही आयची आयची आय... केलं तेव्हा हे मराठीत आयसीआयसी आय झालं असं सांगताच एक हंशा सभे ठिकाणी पिकला. त्याच बरोबर मशिदीवरील भोंगे खाली घेण्याचे आंदोलन मनसेनेच घेतले. पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्याच सरकारने मनसैनिकांवर अनेक केसेस टाकल्या याची आठवण त्यांनी करून दिली.
ट्रेंडिंग बातमी - महायुतीला किती जागा मिळतील? विनोद तावडेंनी थेट आकडा सांगितला
यावेळी राज ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरादर टीका केली. मुंबईच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी राहुल गांधी यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती भेट दिली होती. मात्र त्यांनी त्या मुर्तीकडे पाहीले ही नाही. शिवाय ती स्विकारलीही नाही. मुर्तीकडे बघून दुर्लक्ष केलं असं राज ठाकरे म्हणाले. छत्रपतींचा अपमान करणाऱ्या अशा हाताला तुम्ही निवडून देणार आहात का असा प्रश्न राज यांनी यावेळी केला. सावरकरांना शिव्या देणाऱ्या माणसाला तुम्ही निवडून देणार आहात का असा प्रश्नही त्यांनी केला. ही निवडणूक सोपी नाही. पाच वर्ष नुसता खेळ सुरू आहे. असं राजकारण आतापर्यंत कुणी पाहीलं नाही. त्यामुळे एकदा राज ठाकरेला संधी द्या असं आवाहन त्यांनी केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world