लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला आता काही दिवस शिल्लक राहीले आहेत. या काळात मतदारांना आकर्षीत करण्यासाठी उमेदवार आणि राजकीय पक्ष वेगवेगळ्या युक्त्या करत आहेत. तसेच मोठमोठी आश्वासनं देत आहेत. याचाच एक भाग म्हणून एका अपक्ष उमेदवारानं हातात थेट वस्तरा घेत, एक दिवसासाठी न्हावी बनला. होय तुम्हाला हे ऐकून कसं तरीच वाटेल पण हे खरं आहे. त्यानं नुसता हातात वस्तरा घेतला नाही तर मतदारांच्या दाढ्याही त्यांनी केल्या. दाढी करतो पण मतदान करा असं आवाहनही त्यानं सलूनमध्येच केलं.
तो उमेदवार सोशल मीडियावर व्हायरल
परीराजन रामेश्वरम... हे तामिळनाडूतून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. अपक्ष म्हणून त्यांनी आपला उमदेवारी अर्ज ही दाखल केला आहे. रामनाथपुरम मतदार संघाचे ते उमेदवार आहेत. त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ते मतदारांना आकर्षीत करण्यासाठी चक्क थेट त्यांची दाढी करत आहेत. दाढी करतो पण मतदान करा असं ते आवाहन करत आहेत. यासाठी ते एक दिवसासाठी न्हावी झाले. हातात वस्तरा घेतला, आणि मतदारांच्या दाढ्याही केल्या.
हेही वाचा - विशाल पाटील सांगलीत मविआचा खेळ बिघडवणार? बंधू प्रतिक पाटील प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला
परिराजन यांची सर्वत्र चर्चा
त्यांची मत मागण्याचीही आयडिया सोशल मीडियावर सध्या चांगलाच धुमाकूळ घालत आहे. अन्य उमेदवार किंवा पक्ष मतदारांना मोठमोठी आश्वासन देत असताना परिराजन यांनी दाढी करण्याची भूमिका घेतली. सर्व सामान्यांना आपल्यातला माणूस वाटावा म्हणून ही त्यांची आयडिया होती. ते सलूनमध्ये येणाऱ्या मतदाराला हात जोडून मतदान करण्याचं आवाहन करत होते. त्यानंतर ते त्यांची दाढीही करत होते. त्यामुळे मतदारालाही तसा सुखद धक्काच मिळत होता. एकीकडे निवडणूक झाली की नेत्यांना मतदारांचे काही पडलेले नसते. पण निवडणुकीच्या तोंडावर ते काही करायला तयार असतात त्याचीच प्रचेती यातून आली आहे.
हेही वाचा - 26 वर्षांच्या तरुणामुळे भाजपाचं मिशन धोक्यात
मतदानासाठी अशीही जनजागृती
मतदान करा यासाठी निवडणूक आयोगाकडून वेगवेगळ्या पद्धतीनं जनजागृती केली जाते. विवीध राजकीय पक्ष आणि उमेदवारही त्यात आघाडीवर असतात. सभा, भित्ती पत्रकं, सोशल मीडिया यांच्या मार्फत हे राबवलं जातं. पण परीराजन रामेश्वरम यांनी जनतेत जावू केलेली ही कृती नक्कीच वेगळी ठरते. म्हणूनच त्यांचा हा दाढी करण्याचा व्हीडिओ संपुर्ण देशात व्हायरल झाला आहे. यातून त्यांना प्रसिद्ध तर मिळालीच आहे पण त्यांचा एक प्रकारे प्रचारही झाला आहे. मात्र त्याचा त्यांना किती फायदा होतो हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल.
हेही वाचा - मांजरीला वाचवण्यासाठी एका मागून एक 6 जणांच्या विहिरीत उड्या; नगरच्या कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world