Salman Khan Firing Case: सुपरस्टार सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर रविवारी (14 एप्रिल) पहाटे गोळीबार करण्यात आला होता. या घटनेमुळे सलमानच्या कुटुंबीयांसह त्याचे चाहते देखील चिंतेत आहेत. दरम्यान गोळीबाराच्या घटनेनंतर सलमान खान पहिल्यांदाच घराबाहेर पडला आहे. यावेळेस त्याच्या सुरक्षिततेसाठी कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळाला.
दुसरीकडे तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईने या घटनेची जबाबदारी स्वीकारली आहे. अनमोल बिश्नोईने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत म्हटले की, गोळीबार केवळ एक ट्रेलर होता आणि सलमान खानला हा पहिला व शेवटचा इशारा आहे. बिश्नोई गँगने दिलेली ही धमकी पाहता, मुंबई पोलिसांनी अभिनेत्याच्या सुरक्षेमध्ये वाढ केली आहे.
सोशल मीडियावर सलमान खानचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कडेकोट बंदोबस्तामध्ये तो आपल्या कारमधून घराबाहेर पडत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. इन्स्टाग्रामवरील फिल्मीज्ञान नावाच्या पेजने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की सिक्युरिटी आणि बॉडीगार्ड्सच्या वाहनांसोबत सलमान खान कडेकोट बंदोबस्तात घराबाहेर पडला. सलमान खानच्या निवासस्थानाच्या आसपास देखील मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईने गोळीबारासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करून जबाबदारी स्वीकारली.
अनमोल बिश्नोईने सोशल मीडिया पोस्टमध्ये नेमके काय लिहिले?
"सलमान खान, आम्ही हे फक्त तुला ट्रेलर दाखवण्यासाठी केले आहे. जेणेकरून तुला आमची ताकद समजू शकेल आणि हे पारखून पाहू नका. हा पहिला आणि शेवटचा इशारा आहे. यानंतर घरावर गोळ्या झाडल्या जाणार नाहीत. तू दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलला देव मानले आहे, बाकी जास्त बोलण्याची आम्हाला सवय नाही. लॉरेन्स बिश्नोई ग्रुप, गोल्डी ब्रार ग्रुप, कला जठेडी ग्रुप".
आणखी वाचा
सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या 2 आरोपींना गुजरातमधून अटक, क्राइम ब्रांचची मोठी कारवाई
सलमान खानची सुरक्षा वाढवा, गोळीबारानंतर थेट PM मोदींकडे मागणी
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world