जाहिरात
This Article is From Jun 14, 2024

याचे तोंड गटारासारखे आहे, भ्रष्टाचाराचे सगळे रेकॉर्ड मोडेल; अधिकाऱ्याला वेळीच आवरा!! मोहित कंबोज यांनी केले मुख्यमंत्र्यांना सावध

मुंबई महापालिकेतील एक अधिकारी प्रचंड भ्रष्टाचार करत असून त्याने भ्रष्टाचाराच्या सगळ्या सीमा ओलांडल्याचे कंबोज यांनी म्हटले आहे.

याचे तोंड गटारासारखे आहे, भ्रष्टाचाराचे सगळे रेकॉर्ड मोडेल; अधिकाऱ्याला वेळीच आवरा!! मोहित कंबोज यांनी केले मुख्यमंत्र्यांना सावध
मुंबई:

भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी एक ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे. मुंबई महापालिकेतील एक अधिकारी प्रचंड भ्रष्टाचार (Corruption in BMC) करत असून त्याने भ्रष्टाचाराच्या सगळ्या सीमा ओलांडल्याचे कंबोज यांनी म्हटले आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त दर्जाच्या या अधिकाऱ्याचे तोंड हे गटार असल्याचा आरोप करताना कंबोज यांनी मुख्यमंत्र्यांना सावध करण्याचा प्रयत्न केला आहे.

ट्रेंडींग बातमी - आगामी निवडणुकीत NCP सर्वाधिक जागा लढवेल, मविआमध्ये दबावाच्या राजकारणाला सुरूवात

कंबोज यांनी म्हटले आहे की "माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, एक गोष्ट तुमच्या निदर्शनास आणून द्यायची आहे. मुंबई महापालिकेतील एक अतिरिक्त आयुक्त भ्रष्टाचाराच्या सगळे रेकॉर्ड तोडेल. या अधिकाऱ्याचा भ्रष्टाचार हा कल्पनेपलिकडील असून त्याचे तोंड हे गटारासारखे आहे. या अधिकाऱ्यावर वेळीच लगाम घाला नाहीतर तो सरकारला अडचणीत आणेल "

मुख्यमंत्र्यांना सावध करण्यासाठी केलेल्या ट्विटनंतर कंबोज यांनी आणखी एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की आपण या अधिकाऱ्याच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणार आहोत.

ट्रेंडींग बातमी -जगन्नाथ मंदिराचे चारही दरवाजे उघडले, मंदिरातील 22 पायऱ्यांचं रहस्य माहिती आहे का?

आपण या अधिकाऱ्याचे नाव उघड करणार असून त्याच्याविरोधातील पुरावेही देणार असल्याचे कंबोज यांनी म्हटले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: