महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीसमोर मुख्यमंत्री पदाचा चेहरा आधी जाहीर करावा अशी मागणी केली आहे. महाविकास आघाडीच्या मेळाव्यामध्ये त्यांनी ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांसमोर त्यांनी ही मागणी केली होती. उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते की, 'शरद पवार, नाना पटोले यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आत्ता जाहीर करावा, मी पाठिंबा देतो.'
हे ही वाचा : उद्धव ठाकरेंनी घातलं काँग्रेसचं उपरणं ! बाळासाहेबांचं नाव घेत म्हणाले...
मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात झालेल्या या मेळाव्यात ठाकरेंनी म्हटले होते की 'मुख्यमंत्रीपद मी क्षणात सोडले होते आणि पुन्हा लढतोय ते माझ्या स्वार्थासाठी नाही तर महाराष्ट्रासाठी लढतोय. जागावाटप सुरळीत पार पडेल, चिंता नसावी.' ठाकरेंनी ही भूमिका मांडल्यानंतर याबाबत काँग्रेसच्या नेत्यांनी आणि शरद पवारांनी चकार शब्दही काढला नव्हता. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठीच्या चेहऱ्याबाबत बंद दाराआड निर्णय घेण्यात यावा असेही बोलल्याचे कळते आहे. राज्यातील नेते आपल्या मागणीकडे लक्ष देत नसल्याने उद्धव ठाकरेंनी आपले म्हणणे थेट दिल्लीतील काँग्रेस हायकमांडकडे मांडले.
हे ही वाचा: उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असावा का? काँग्रेस नेता काय म्हणाला?
तूर्तास कोणी चेहरा नको
उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस हायकमांडशी संपर्क साधून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आधी जाहीर करावा अशी मागणी केली. काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने ठाकरेंची ही मागणी धुडकावून लावली. महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीला सत्तेतून खाली खेचावे, महाविकास आघाडीचे सरकार येईल अशी परिस्थिती निर्माण व्हावी ती झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निश्चित केला जावा असे काँग्रेस हायकमांडने ठाकरेंना सांगितले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महाराष्ट्राच्या मनात उद्धव ठाकरेच!
'मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांनी स्वत:हून पुढे येण्याची गरज नाही. 2019 मध्ये ही ते मुख्यमंत्रिपदासाठी पुढे आले नव्हते. सर्वांनी मिळून त्यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवले होते' असे शिवसेना (उबाठा) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते. अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी चांगले काम केले. मविआच्या मेळाल्यातही त्यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा केला नव्हता, किंवा मला मुख्यमंत्री व्हायचे आहे असे म्हटले नव्हते. मुख्यमंत्रिपदासाठी जर कोणी उमेदवार असेल तर त्याचे नाव जाहीर करा मी त्याला पाठिंबा देतो असे वक्तव्य केले होते, असे राऊत यांनी म्हटले आहे. असं असलं तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात उद्धव ठाकरेच आहेत असे राऊत यांचे म्हणणे आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world