जाहिरात

Maharashtra Election 2026: कुठे दोस्ती, कुठे कुस्ती? आघाडी, युतीचा गोंधळ क्लिअर होईल; वाचा सगळ्या डिटेल्स

Maharashtra Municipal Election 2026: सत्ताधारी महायुतीतील घटक पक्ष काही ठिकाणी एकत्र आलेत तर काही ठिकाणी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. महाविकास आघाडीचेही हेच चित्र पाहायला मिळते आहे. यामुळे बराच गोंधळ उडाला आहे.

Maharashtra Election 2026: कुठे दोस्ती, कुठे कुस्ती? आघाडी, युतीचा गोंधळ क्लिअर होईल; वाचा सगळ्या डिटेल्स
मुंबई:

नगरपालिका निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर (Nagar Palika Election Result 2025) महाराष्ट्रात बहुचर्चित अशा 29 महानगरपालिका निवडणुका होत आहेत. (Municipal Corporation Election 2026) या महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी स्थानिक पातळीवरील गणिते पाहात युची, आघाडी केली आहे. सत्ताधारी महायुतीतील घटक पक्ष काही ठिकाणी एकत्र आलेत तर काही ठिकाणी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. महाविकास आघाडीचेही हेच चित्र पाहायला मिळते आहे. यामुळे बराच गोंधळ उडाला आहे. युती आणि आघाडीचे सगळ्या महानगरपालिकांमधील चित्र स्पष्ट करण्यासाठी आम्ही कोणत्या महानगरपालिकेमध्ये कोणाची आघाडी आणि कोणीची युती झाली आहे त्याची संपूर्ण यादीच देत आहोत. 

नक्की वाचा: निवडणूक आयोगाचा एक आदेश; बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांची धाकधूक वाढली

मुंबई, ठाणे पुणे आणि नाशिकमध्ये कोणात होतेय लढत ? (Mumbai,Thane,Pune Nashik Municipal Corporation Election 2026)

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत (Mumbai Municipal Coirporation BMC Election  2026)  ठाकरे बंधूंचे पक्ष मनसे आणि शिवसेना(उबाठा) आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवत असून त्यांची मुख्य लढत ही भाजप आणि शिवसेना यांच्यात होणार आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवत असून, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र निवडणूक लढवत आहेत. मुंबईत चौरंगी लढत होताना दिसते आहे.  

ठाणे महानगरपालिका निवडणुकीत (Thane Municipal Coirporation TMC Election  2026) एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणूक लढवत आहेत. मुंबईप्रमाणेच ठाकरे बंधूंचे पक्ष ठाण्यातही एकत्र आले असून शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसही त्यांच्यासोबत आहे. ठाणे महानगरपालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढते आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसही स्वबळावर ठाणे महानगरपालिका निवडणूक लढवत आहेत. 

नक्की वाचा: महिलांना 1500 रुपये, तर 10 रुपयात जेवण; आदित्य आणि अमित ठाकरेंकडून विकासाचा 'रोड मॅप' जाहीर

पुणे महानगरपालिका निवडणुकीत (Pune Municipal Coirporation PMC Election  2026) भाजप स्वतंत्रपणे लढत असून दोन्ही राष्ट्रवादी ही निवडणूक एकत्रितरित्या लढवत आहे. ठाकरे बंधू आणि काँग्रेसने पुण्यात हातमिळवणी केली असून शिंदेंची शिवसेना ही स्वबळावर लढते आहे. पुण्यात चौरंगी लढत होताना दिसते आहे.  

नाशिक महानगरपालिका निवडणुकीत (Nashik Municipal Coirporation NMC Election  2026)  भाजप स्वबळावर लढत असून नाशिकमध्ये महायुतीतले भाजपचे मित्र पक्ष म्हणजेच एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आहेत. नाशिकमध्ये महाविकास आघाडी आणि मनसे एकत्रितरित्या लढत आहेत.  

ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील इतर महानगरपालिकांमधील चित्र कसे आहे ?

  1. ठाणे आणि मुंबईमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र आली मात्र नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकलेत. 
  2. उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये सगळे पक्ष स्वबळावर लढताना दिसत आहेत.  भाजप, शिंदेंची शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी या सगळ्या पक्षांनी स्वबळाचा नारा दिला आहे.  
  3. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने युती केली असून ठाकरे बंधूंचे पक्षही ही निवडणूक एकत्रितरित्या लढत आहेत. काँग्रेसने मात्र ठाण्याप्रमाणे इथे वेगळी चूल मांडली असून काँग्रेस स्वबळावर लढते आहे.  
  4. भिवंडी महानगरपालिकेमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे युती करून लढत आहेत. काँग्रेस पक्ष भिवंडीमध्ये स्वबळावर लढत असून इथे समाजवादी पक्षानेही स्वबळाचा नारा दिला आहे.  
  5. मिरा-भाईंदर महानगरपालिकेमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना आमनेसामने उभे ठाकले आहेत. इथे जवळपास सगळे पक्ष स्वबळावर लढत आहेत.  
  6. वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीने आपली पूर्ण ताकद पणाला लावली असून भाजप आणि शिवसेना युतीने त्यांच्यापुढे आव्हान उभे केले आहे, ठाकरेंची शिवसेना ही स्वबळावर लढते आहे.  
  7. पनवेल महानगरपालिकेमध्येही शिवसेना आणि भाजपची युती झाली असून महाविकास आघाडी एकत्रितपणे इथे लढते आहे.   

नाशिक विभागातील चित्र कसे आहे?

  1. मालेगावमध्ये एमआयएम, मालेगाव सेक्युलर फ्रंट यांच्यासह भाजप, शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी हे सगळेच पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत.  यामुळे इथे बहुरंगी लढत बघायला मिळते आहे. 
  2. अहिल्यानगरमध्ये भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने युती केली आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना स्वबळावर लढते आहे. महाविकास आघाडी ही एकत्रितपणे इथे निवडणूक लढवत आहेत. 
  3. जळगावमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती झाली असून इतर सगळे पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहे.  
  4. धुळ्यामध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले असून भाजप धुळ्यामध्ये स्वबळावर लढते आहे. महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र आले असल्याने धुळ्यामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळते आहे.  

नागपूर विभागातील चित्र कसे आहे? 

  1. अमरावती महानगरपालिका निवडणुकीत भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी गट (अजित पवार आणि शरद पवार), काँग्रेस, बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम असे सर्वच प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत.  
  2. अकोला महानगरपालिका निवडणुकीत शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आघाडी केली असून  दोन्ही शिवसेना, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत.  
  3. चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्रितरित्या निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना युती करून निवडणूक लढवत आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com