आज सकाळपासून कोकणासह (Maharashtra Heavy Rain) मुंबई, ठाणे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्यात तुफान पाऊस सुरू असून सुरक्षिततेच्या कारणास्तव शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुढील तीन तासांत पुणे, सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे शहर आणि घाट क्षेत्रात (Rain Update) मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर आणि पुणे शहरातील शाळा आज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खडकवासला धरणातून 40 हजार क्यूसेक विसर्ग सुरू आहे.
सांगलीत कृष्णा आणि वारणा नद्यांच्या वाढती पाणीपातळीच्या पार्श्वभूमीवर शाळांना उद्या सुट्टी जाहीर
सांगलीत कृष्णा आणि वारणा नद्यांच्या वाढती पाणीपातळीच्या पार्श्वभूमीवर शाळांना उद्या सुट्टी जाहीर.
शिराळा,पलूस,वाळवा आणि मिरज तालुक्यातल्या सर्व शाळा/ महाविद्यालयांना 26 जुलै रोजी जाहीर करण्यात आली सुट्टी.
सातारा जिल्ह्यातल्या रेड अलर्ट व वारणा,कृष्णा नद्यांची वाढती पाणी पातळीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी घोषित केली सुट्टी.
कृष्णा आणि वारणा नदी काठावर नागरिकांसाठी बंदी आदेश देखील करण्यात आला जाहीर.
पूर परिस्थितीत स्टंटबाजी, सेल्फी आणि गर्दीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला निर्णय..
पुणेकरांना दिलासा, मागील 3 तासांपासून पाऊस थांबला
मागील 3 तासापासून पुण्यातील पाऊस थांबला.
पाऊस थांबल्यामुळे पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत होईल.
खडकवासला धरणातून विसर्ग सुरू झाल्यानंतर एकता नगर भागात पाण्याची पातळी थोडीशी वाढली
पण पाऊस थांबल्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा
कल्याण-डोंबिवलीतील शाळांना उद्या सुट्टी जाहीर
कल्याण-डोंबिवलीतील शाळांना उद्या सुट्टी जाहीर.
हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील शाळांना सुट्टी जाहीर.
पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व शाळा राहणार बंद
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचा निर्णय
पुण्याला पावसाने झोडपले, नागरिकांची दाणादाण; पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने सैन्याला पाचारण केले
पुण्याला पावसाने झोडपले, नागरिकांची दाणादाण
पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने सैन्याला पाचारण केले
एनडीआरएफच्या मदतीने पुण्यामध्ये बचावकार्य सुरु
पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची माहिती
ठाणे महापालिका क्षेत्रातील शाळांना उद्यासाठी सुट्टी जाहीर
ठाणे महापालिका क्षेत्रातील शाळांना उद्यासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागाकडून उद्या ठाण्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून उद्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
खडकवासला धरणातून पाण्याचा पुन्हा विसर्ग सुरू
खडकवासला धरणातून पाण्याचा पुन्हा विसर्ग सुरू झाला आहे. टप्प्याटप्प्याने 15000 पासून ते 35000 पर्यंत पाणी वाढवलं जाणार आहे. धरणातून विसर्ग सुरू होताच सिंहगड रोडवरच्या 15 सोसायटीमध्ये पुन्हा एकदा पाणी शिरलं आहे. काही वेळापूर्वी इथलं पाणी कमी झालं होतं, परंतु आता इथे कमरेएवढी पाणी पातळी झाली आहे. या भागामध्ये आणखी पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. रेस्क्यू टीमने 160 जणांना इथून सुरक्षित हलवलं आहे.
यवतमाळच्या बेंबळा नदीवरील धरणाचे सहा दरवाजे उघडले
यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील बेंबळा नदी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असुन मागील काही दिवसांपासून संतधार कुठे मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल आहे सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्या आता दुथडी भरून वाहत आहे .
जिल्ह्यातील विविध धरणांच्या पाणीपातळीतील मोठी वाढ झाली आहे जिल्ह्यातील मोठे धरण असलेल्या बेंबळा धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले आहे येथून 258 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे जिल्ह्यातील नदी नाल्याकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे .
बदलापूर शहराला पुराचा धोका, उल्हास नदीच्या पाणीपातळी प्रचंड वाढ
पुणे आणि रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीची पाणी पातळी प्रचंड वाढली आहे. बदलापुरात तर उल्हास नदी धोक्याच्या पातळीच्याही वरून वाहत आहे. उल्हास नदीच्या या पुराचं पाणी बदलापूर शहरात घुसलं आहे. अनेक सखल परिसर जलमय झाले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून बदलापूर शहरात एनडीआरएफ तैनात करण्यात आली आहे. उल्हास नदीचं हे रूप अनेक वर्षांनी बदलापूरकरांना पाहायला मिळत असून घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहिल्यास बदलापूर शहराला पुराचा धोका निर्माण होण्याची भीती आहे.
पुरंदरमधील वीर धरणातून नीरा नदीत विसर्ग वाढवला, नदीकाठच्या गावांना इशारा
पुरंदरमधील वीर धरणातून नीरा नदीत विसर्ग वाढवला
वीर धरणातून नीरा नदीत 55644 क्युसेक ने विसर्ग
नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
लवासा परिसरात दरड कोसळली, काही बंगल्यांना नुकसान
पुण्यात सततच्या पावसाने लवासा परिसरात दरड कोसळली
दरड कोसळल्याने काही बंगले देखील त्या खाली आल्याची माहिती
लवासा ते वरसगाव रस्त्याला भेगा पडल्याची माहिती
दरड कोसळलेल्या भागात एनडीआरएफ दाखल
सातारा जिल्ह्यात आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक 26 जुलै 2024 रोजी सातारा जिल्ह्यात आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित व विना अनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व औदयोगिक प्रशिक्षण संस्था यांचे आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना दिनांक 26 जुलै 2024 रोजी सुट्टी जाहीर केली आहे. शाळा व महाविद्यालयातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत संबधीत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे, तसेच इयत्ता 10वी व 12 वी च्या जुलै 2024 च्या फेर परीक्षा राज्य मंडळ पुणे यांचे वेळापत्रकानुसार सुरू राहतील.
बीडच्या परळी तालुक्यातील बोरना नदी दुथडी भरून वाहू लागली
बीडच्या परळी तालुक्यातील बोरना नदी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे दुथडी भरून वाहू लागली आहे. याआधी परिसरात झालेला पाऊस खूपच कमी होता. मात्र गेल्या 24 तासात झालेल्या पावसामुळे बोरणा नदी खळखळून वाहताना दिसून आली. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
आज राज्यामध्ये सर्वत्र मुसळधार
आज राज्यामध्ये सर्वत्र मुसळधार असा पाऊस पडताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तर पुणे जिल्हा हा तहानलेलाच होता विशेषतः आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरण पुणे आणि नगर या दोन्ही जिल्ह्यांसाठी वरदान ठरतं. या धरणातला पाणीसाठा हा अत्यल्प होता. त्यामुळेच सगळ्यांचे लक्ष या धरणातील पाणी साठ्याकडे लागलं होतं. मात्र काल रात्रीपासून जो मुसळधार पाऊस या परिसरात पडतो. विशेषतः भीमाशंकर आणि परिसरामध्ये त्यामुळे धरण आता 50% होऊन अधिक पाणीसाठ्याकडे वाटचाल करत आहे. त्याच्यामुळेच ही बाब शेतकऱ्यांसह नागरिकांसाठी समाधानाची बाब ठरते आहे.
सुप्रिया सुळेंनी पावसाचा मुद्दा लोकसभेत मांडला...
पुणे, कोल्हापूर आणि महाराष्ट्रातील इतर भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुण्यात खडकवासला धरणातून विसर्ग करण्यात येत आहे. याबाबत शासनाकडून पुरेशी काळजी घेण्यात आली नाही. हा मुद्दा शून्य प्रहरादरम्यान सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत उपस्थित केला. यासोबतच एनडीआरएफच्या माध्यमातून बाधित क्षेत्रात केंद्राने मदत पोहोचवावी अशी मागणीही केली.
कल्याणहून शहाड मार्गे टिटवाळ्याकडे जाणारा मार्ग जलमय
कल्याणहून शहाड मार्गे टिटवाळ्याकडे जाणारा मार्ग जलमय झाला आहे. कल्याण शहाड दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रस्ता बंद झाला आहे. एकीकडे कल्याण नगर मार्ग बंद झाला, त्यापाठोपाठ कल्याण टिटवाळा मार्गावरील शहाड मोहने रस्त्यावर पाणी साचले आहे. वाहतूक पोलिसांकडून रस्ता बंद करण्यात आला तरी पर्यायी रस्ता नसल्याने जीव मुठीत घालून वाहन चालक पाण्यातून मार्ग काढत वाहन चालवत आहेत.
पुरंदरमधील वीर धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला
पुरंदरमधील वीर धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढत असून वीर धरणाची पाणी पातळी 579.68 मिटर झाली असल्याने वीर धरणाच्या सांडव्याद्वारे नीरा नदी पात्रात 13900 क्युसेक इतका विसर्ग सुरू करण्यात आला होता. आता यात वाढ करण्यात आली असून तो 55644 क्युसेक इतका वाढवण्यात येणार आहे.
बदलापुरात एनडीआरएफची टीम दाखल
बदलापुरात एनडीआरएफची टीम दाखल
उल्हास नदीला पूर आल्यानं एनडीआरएफची टीम बदलापुरात
आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास होणार एनडीआरएफची मदत
मुंबईत आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा
मुंबईसह पालघर, ठाणे, रायगडमध्ये आज काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता
भारतीय हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
मुंबईत आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा
मुसळधार पावसामुळे मिठी नदी भरली...
मुंबईकरांना दिलासा...पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय
मुंबईकरांना दिलासा...
सोमवारी 29 जुलैपासून दहा टक्के पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या चार जलाशयांमध्ये पाणी भरून पाहू लागले. त्यामुळे पाणीकपातीचा निर्णय मागे घेण्यात आला आहे
बदलापूर शहराला पुराचा धोका
बदलापुरात उल्हास नदीने धोक्याची पातळी सुद्धा ओलांडली
उल्हास नदीची सध्याची पाणीपातळी 17.80 मीटर
धोका पातळी 17.50 मीटर इतकी
बदलापूर शहराला पुराचा धोका निर्माण झाला आहे
प्रशासनाकडून नदीकिनारच्या रहिवाशांना सतर्कतेचं आवाहन
नदीने 20 मीटर पाणीपातळी गाठल्यास शहरात येणार पूर
इगतपुरीत मुसळधार पाऊस, भावली धरण 100% भरले
नाशिकमध्ये यंदा पावसाने पाठ फिरवल्याचं चित्र बघायला मिळत होतं. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने जिल्ह्याच्या धरणसाठ्यात वाढ झाली असून बुधवारी एकाच दिवसात जिल्ह्याचा उपयुक्त पाणीसाठा 7 टक्क्यांनी वाढून 40 टक्क्यांवर गेला आहे. इगतपुरीत मुसळधार पाऊस बरसत असल्याने भावली धरण 100% भरले आहे. तर दारणा धरण 75 टक्के भरल्याने विसर्गाला सुरुवात झाली असून नांदूर माध्यमेश्वर बंधाऱ्यातून मराठवाड्याकडे पाणी सोडण्यासही सुरुवात झाली आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणसमूहात 49 टक्के पाणीसाठा झाला असून जिल्ह्यातील ईतर 18 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. हवामान विभागाकडून आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून आज जोरदार पावसाची शक्यता आहे.
टिटवाळामधील गणपती मंदिराकडे जाणारा रस्ता बंद
टिटवाळा कल्याण
टिटवाळामधील पटेल मार्ट जवळ पाणी साचल्याने गणपती मंदिराकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे. तसंच पटेल मार्ट, रिजेन्सी सर्वम, घरअंगण सोसायटी, आणी आजूबाजूच्या चाळीमध्ये पाणी शिरल्याने नागरिक त्रस्त. सध्या टिटवाळा रेल्वे स्टेशन ते गणपती मंदिराकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद आहे
पालघर जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस
पालघर जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. वसई विरार नालासोपारा येथील सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचू लागले आहे. वसई पूर्व एव्हर शाईन, सन सिटी, तसेच नालासोपारा स्टेशन परिसर, तूलिंज, गाला नगर, आचोले रोड याठिकाणी रस्ते जलमय झाले आहेत. तर विरार पश्चिमेच्या जुने वीवा कॉलेज परिसर आणि बोळींज परिसरात पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल आहे.
उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली
कालपासूनच्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ
उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली
कल्याणनगर मार्गावरील रायते पुलाला लागलं उल्हास नदीचे पाणी
पावसाचा जोर वाढल्यास पाणी पुलावरून जाण्याची शक्यता
रायते पुलावरून पाणी गेल्यास कल्याण नगर महामार्गावरील वाहतूक बंद
टिटवाळा गोवेली मार्गे कल्याणला जाण्याचा पोलिसांचा आव्हान
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणीसाठा वाढला...
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणीसाठा 66.77 टक्क्यांवर पोहोचले आहे. तुलसी, विहारनंतर तानसा देखील ओव्हरफ्लो झाला आहे. मोडकसागर तलाव देखील ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. मोडकसागरमध्ये 98.66 टक्के जलसाठा आहे, मध्य वैतरणा 63.32 टक्के, भातसा 64.09 टक्के, अप्पर वैतरणा 34.13 टक्के आहे.
ठाणे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर
ठाणे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर
दुपार सत्रातील विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सकाळ सत्रातील विद्यार्थी शाळेत आले असतील तर त्यांना सुरक्षितपणे घरी पोहोचवण्याची जबाबदारी मुख्याध्यापक आणि शिक्षकांची असेल.
खडकवासला कालव्याची काय आहे स्थिती?
पुण्याच्या मुळशी तालुक्यातील कासारसाई धरणाच्या सांडव्यातून कासारसाई नालापात्रात 3500 क्यूसेकने सुरू असणारा पाण्याचा विसर्ग 1000 ने वाढवून 4500 क्यूसेकने करण्यात आला आहे. आज दिवसभर पाऊस वाढत राहिल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी - जास्त करण्यात येणार असल्याची माहिती खडकवासला कालवा उपविभागाच्यावतीने देण्यात आली आहे. त्याच बरोबर नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा ही देण्यात आला असून गावकऱ्यांनी नदीपात्रात उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात याव्या अश्या सूचना गावकऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुण्यातील परिस्थितीचा आढावा
पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सकाळीच जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे प्रमुख सुहास दिवसे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून जिल्ह्यातील पूरपरिस्थिती तसेच बचाव व मदतकार्याच्या तयारीचा आढावा घेतला. खडकवासला तसेच जिल्ह्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस होत असल्याने प्रशासन तसेच आपत्ती निवारण यंत्रणेने सतर्क राहुन नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे व आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नजीकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधण्याचे तसेच महत्त्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
ताम्हिणी घाटात दरड कोसळल्यामुळे घाटातून वाहतूक बंद
पुणे - रायगड मार्गावरील ताम्हिणी घाटात दरड कोसळल्यामुळे घाटातून वाहतूक बंद करण्यात आली आहे. घाट साधारण 4-5 तास बंद राहिल असा अंदाज आहे.
गेल्या 24 तासात अग्निशमन दल नियंत्रण कक्षात 24 झाड पडल्याच्या नोंदी
सतत पडणाऱ्या मुसळधार पाऊसामुळे पुणे शहरात 24 झाड पडल्याची नोंद झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.
गेल्या 24 तासात अग्निशमन दल नियंत्रण कक्षात 24 झाड पडल्याच्या नोंदी
१) औंध, अनंत पार्क
२) एरंडवणा, नवनाथ मिञ मंडळ
३) महर्षी नगर, ठाकुर बेकरी
४) नवी पेठ, म्हाञे पुलानजीक
५) वानवडी, महंमदवाडी रस्ता
६) शुक्रवार पेठ, सुभाष नगर
७) एफ सी रोड, दीनदयाल हॉस्पिटल
८) जाभुंळवाडी रस्ता
९) उंड्री, होले वस्ती
१०) फातिमानगर
११) बालेवाडी, प्रथमेश पार्क
१२) कोथरुड, डहाणूकर कॉलनी
१३) कोथरुड, वनाज कंपनी जवळ
१४) मंगलदास रस्ता
१५) खडकमाळ आळी
१६) क्वीन्स गार्डन
१७) गुलटेकडी, मिनाताई ठाकरे वसाहत
१८) विमाननगर
१९) कळस गावठाण
२०) एरंडवणा, दिनानाथ हॉस्पिटल
२१) बाजीराव रस्ता
२२) सिटीप्राईड, उत्सव हॉटेल
२३) औंध, आयटीआय रस्ता
२४) कोथरुड, हॅप्पी कॉलनी
भीमाशंकर मार्गावर दरड कोसळली
भीमाशंकर मार्गावर दरड कोसळली असून राजगुरुनगर मार्गे भीमाशंकरला जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. अनेक गावांना दरड कोसळण्याचा धोका आहे. भीमाशंकर राजगुरुनगर मार्गावर मोरोशी शिरगाव फाट्यावर दरड कोसळल्याची दुदैवी घटना घडली असून बाजुलाचा असणारा जनावरांचा गोठा थोडक्यात बचावला. प्रशासनाकडून दरड काढण्याचे काम सुरू असून राजगुरुनगर मार्गे भीमाशंकरला जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे