जाहिरात

Amit Thackeray : अमित ठाकरे विधानसभा लढवणार? त्या 3 मतदारसंघांवर कोणाचा कंट्रोल?

अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. जिंकता येईल असे कोणते पर्याय खुले आहेत?

Amit Thackeray : अमित ठाकरे विधानसभा लढवणार? त्या 3 मतदारसंघांवर कोणाचा कंट्रोल?
मुंबई:

आतापर्यंत ठाकरे कुटुंबातील कोणीच निवडणूक लढवली नव्हती. वरळी विधानसभा (Worli Assembly) मतदारसंघातून आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी निवडणूक लढवली आणि ते जिंकूनही आले. पहिल्यांदाच आमदार झालेल्या आदित्य ठाकरेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळही पडली होती. निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले आदित्य ठाकरे हे ठाकरे कुटुंबातील पहिली व्यक्ती होते. त्यांच्या पाठोपाठ आता राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात नशीब आजमावणार आहेत. 

सोमवारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली होती. यामध्ये अमित यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. 
मनसे नेते अमित ठाकरे यांनी भांडुप, मागाठाणे विधानसभेतून निवडणूक लढवावी अशी मागणी तेथील कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी भांडुप, मागाठाणेमध्ये बॅनर लावले आहेत. अमित ठाकरे यांनी माहीम, भांडुप, मागाठाणे येथून निवडणूक लढवावी अशी मनसे कार्यकर्त्यांची मागणी आहे. नुकत्याच झालेल्या मनसेच्या बैठकीत अमित ठाकरे यांनी पक्षाच्या नेत्यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी आग्रही भूमिका घेतली होती. 

माहीम, भांडुप, मागाठाणे या तिन्ही मतदारसंघांचा आढावा घेतला तर विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. तर पहिल्या क्रमांकावर शिवसेनेचा उमेदवार पाहायला मिळत आहे. 

नक्की वाचा - अमित ठाकरेंनी आमच्या मतदारसंघातून लढावे! मनसेच्या पदाधिकाऱ्याने व्यक्त केली इच्छा

दादर माहीम मतदारसंघ...
या मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे अमित ठाकरे यांना निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. 2009 मध्ये हा मनसेचा बालेकिल्ला होता. 2014 साली या मतदार संघातून शिवसेना, भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे चार मुख्य पक्ष वेगवेगळे लढले होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे सदा सरवणकर 61,337 मतं मिळवून विजयी झाले होते. मनसे पक्षाचे संदीप सुधाकर देशपांडे यांना दुसऱ्या क्रमांकाची 42,690 मतं मिळाली होती.

भांडुप पश्चिम विधानसभा मतदारसंघ...
2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे रमेश गजानन कोरगावकर 71,955 मते मिळवून विजयी झाले होते. मनसे पक्षाचे संदीप प्रभाकर जळगावकर यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यावेळी शिवसेनेचे रमेश कोरगांवकर निवडून आले होते. मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर रमेश कोरगांवकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला होता.   

एक देश, एक निवडणूक प्रस्तावाला केंद्र सरकारची मान्यता! वाचा तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं

नक्की वाचा - एक देश, एक निवडणूक प्रस्तावाला केंद्र सरकारची मान्यता! वाचा तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं

मागाठाणे विधानसभा मतदारसंघ
मागाठाणे हा मतदारसंघ मनसेचा पारंपरिक मतदारसंघ आहे. या मतदारसंघात काही अंशी  मनसेची ताकद आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे प्रकाश राजाराम सुर्वे 90,206 मते मिळवून विजयी झाले होते. मनसे पक्षाचे नयन प्रदीप कदम यांना दुसऱ्या क्रमांकाची (41,060) मतं मिळाली होती. विजयाचे अंतर 49,146 मतांचं होतं.  

Switch To Dark/Light Mode
Previous Article
बदलापूर प्रकरण- FIR व्हायरल केल्याचा आरोप, वामन म्हात्रे आणि महेंद्र शेळकेंविरोधात तक्रार
Amit Thackeray : अमित ठाकरे विधानसभा लढवणार? त्या 3 मतदारसंघांवर कोणाचा कंट्रोल?
Pali-Khopoli highway Accident Bike dashed school bus three people died
Next Article
पाली-खोपोली महामार्गावर अपघातांची मालिका; शाळेच्या बसला बाईकची धडक, तिघांचा जागीच मृत्यू