जाहिरात
5 months ago
मुंबई:

Vidhan Parishad :  पुण्यातील ड्रग्स प्रकरणाचा मुद्दा आज विधान परिषदेत उपस्थित केला जाणार आहे. पुण्यातील येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडे गांजा व अन्य अमली पदार्थ सापडल्याच्या घटना वारंवार घडत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर विद्यापीठ वसतिगृहात एका विद्यार्थ्याकडे गांजा हा अंमली पदार्थ सापडणे, त्याप्रकरणी विद्यापीठाने कुलगुरु यांची भेट घेऊन दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी केली आहे. हा मुद्दा विधानपरिषदेत गाजण्याची शक्यता आहे. याशिवाय डोंबिवली स्फोटाची लक्षवेधी यावेळी असेल. जिल्ह्यात जल, वायू प्रदूषणाला कारणीभूत सुमारे 2,294 रेड झोनमधील कारखान्यांचा समावेश असल्याचे वास्तव प्रशासनाच्या अहवालावरून उघड झाले असून आमदार उमा खापरे यावर कडक कारवाईची मागणी करणार आहेत. 

अंबादास दानवे यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांना दिलं दिलगिरीचं पत्र

अंबादास दानवे यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांना दिलगिरीचं पत्र दिलं आहे. त्यामुळे अंबादास दानवे यांचं निलंबन मागे घेण्याची शक्यता

Video : आमदार भास्कर जाधव रमले शेतात

रत्नागिरी - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, आमदार भास्करराव जाधव यांनी विधानसभेच्या अधिवेशनतून वेळ काढून आज कुटुंबासमवेत त्यांच्या चिपळूण तालुक्यातील तूरंबव या मूळ गावी शेतात रमले. चिपळूण तालुक्यातील तुरुंबव गावी भास्कर जाधव सहकुटुंब शेती करीत असल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. गेली अनेक वर्षे नांगरणीपासून ते भात लावणीपर्यंतची सगळी काम भास्कर जाधव आवडीने करतात. येणाऱ्या पिढीला शेतीचे महत्व कळावं यासाठी भास्कर जाधव यांची धडपड असते. शेतात भलरी म्हणण्यापासून ते ट्रॅक्टर चालवण्यापर्यंत काम करत भास्कर जाधव शेतीच्या कामात रमले. अधिवेशनाच्या व्यस्त कामात देखील एक दिवस गावाला येऊन भास्कर जाधव यांनी भात शेती केली. 

धरणाचे पाणी रस्त्यावर आल्याने कास पठार ते बामणोली रस्ता बंद

सातारा : कास पठार ते बामणोली रोड बंद 

कास धरणाचे पाणी रस्त्यावर आल्याने कास पठार ते बामणोली हा रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे  घाटाई देवी रोड मार्गे पर्यायी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. साताऱ्याच्या पश्चिम भागात गेल्या दोन दिवसांपासून धुवाधार पाऊस सुरू आहे. अशातच कास परिसरातील संपूर्ण भागामध्ये जोरदार पाऊस पडत असल्याने कास धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे आणि त्यामुळेच कास धरणाचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक संपूर्णपणे बंद झालेली आहे. 

मंत्रालयाबाहेर अंबादास दानवेंच्या समर्थकांचं आंदोलन

मंत्रालयाबाहेर अंबादास दानवेंच्या समर्थकांचं आंदोलन

विधानपरिषदेत मराठा आरक्षणावर चर्चा...

विधानपरिषदेत मराठा आरक्षणावर चर्चा...

दिवेघाटाचा प्रवास संपवून ज्ञानोबा माऊलींचा सासवडमध्ये मुक्कामी

पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेतून Live

पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेतून Live

राज्यसभेच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत भाषण करीत होते. यावेळी विरोधकांनी गोंधळ घातल्याचं दिसून येत आहे. 

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्षवेधी मांडणार

विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आजचा सहावा दिवस महत्त्वाच्या प्रश्नांनी गाजणार आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्षवेधी मांडणार आहेत. तर विधान परिषदेत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील बोलणार आहे. विशेष म्हणजे विधानपरिषदेचं सभागृह हे पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्यांविना चालणार आहे. राज्याचं सुधारित नगररचना विधेयक मंजुरीसाठी विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात येईल. पुणे ड्रग्ज केसचा मुद्दाही आज तापण्याची शक्यता आहे. या सोबतच टी२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारतीय संघाच्या अ़भिनंदनाचा प्रस्ताव परिषदेत मांजला जाईल.

 

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा

विश्र्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा आज त्र्यंबकेश्वर येथे होत आहे. त्यातच त्यांचा पायी दिंडी सोहोळा हा अहमदनगर येथील मार्केट यार्ड येथे आयोजित करण्यात आला आहे. त्या ठिकाणी देखील संजीवन समाधी सोहोळा साजरा केला जातो.  निवृत्तीनाथ महाराज यांच्या 727 व्या संजीवन समाधी निमित्त जयंत महाराज गोसावी यांचे कीर्तन अहमदनगरमध्ये  झाले. यावेळी हजारो वारकरी या कीर्तनासाठी उपस्थित होते. ज्येष्ठ वद्य द्वादशीला निवृत्तीनाथ महाराज यांनी संजीवन समाधी घेतली होती. हा संजीवन समाधी सोहळा नाशिक येथील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी पार पडत असतो आणि त्याच वेळी अहमदनगरमध्ये देखील समाधी सोहोळा साजरा केला जातो.

विधान परिषदेत ठाकरे गटाचे आमदार अनुपस्थितीत..

विधान परिषदेत ठाकरे गटाचे आमदार अनुपस्थितीत..

अंबादान दानवेंविरोधात केलेल्या कारवाईचा निषेध व्यक्त करीत ठाकरे गटाचे आमदार आज विधान परिषदेत अनुपस्थित आहेत. दानवेंचं पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं आहे. त्याविरोधात ठाकरे गटाचे आमदार विधान परिषदेत उपस्थित राहिले नाहीत. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com