महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह हे महाराष्ट्रात आहेत. या दौऱ्यात जागा वाटपाची चर्चा झाली आहे. मात्र तोडगा काही निघू शकलेला नाही. अजूनही महायुतीत 90 जागांवर तिढा हा कायम आहे. तो अमित शाह आल्यानंतरही सुटू शकलेला नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र बसून यावर तोडगा काढावा अशा सुचना शाह यांनी दिल्या आहेत.जागा वाटपाबाबत अजूनही एकमत होत नसले तरी महायुतीची पहिली यादी जाहीर करण्याचा मुहूर्त मात्र निश्चित झाल्याचे समजत आहे. त्यामुळे ही यादी त्याच मुहूर्तावर जाहीर केली जाईल असे समजत आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी जागा वाटपाबाबत चर्चा केली आहे. असं असलं तरी 90 जागा अशा आहेत ज्याबाबत एकमत होवू शकलेले नाही. या जागांवर तिन्ही पक्षांनी दावा सांगितला आहे. त्यामुळे या जागांबाबत कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. या जागांवर तातडीने निर्णय घ्या अशा सुचना अमित शाह यांनी केल्या आहेत. शिवाय येत्या दोन दिवसात तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्र बसून या जागांबाबत निर्णय घ्यावा असेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर आता या नव्वद जागांवर मार्ग काढण्याची जाबाबदारी टाकण्यात आली आहे.
ट्रेडिंग बातमी - अक्षय शिंदेचं घर महिन्याभराने उघडलं, मृतदेह आणणार, घरी कोण-कोण आले?
विद्यमान आमदार ज्या पक्षाचा त्या पक्षाची ती जागा हे सुत्र अंतिम करण्यात आलं आहे. त्यामुळे सध्या जे आमदार आहे त्याच पक्षाला ती जागा मिळणार हे निश्चित झाले आहे. ज्या ठिकाणी भाजपचा उमेदवार कमजोर असे तिथे ती जागा अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांना सोडली जाईल. ज्याचा उमेदवार मजबूत त्याला ती जागा असेही सुत्र ठरले आहे. अशा वेळी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याची रणनिती महायुतीतल्या प्रत्येक पक्षाची आहे.
सध्याच्या स्थिती जागा वाटपाबाबत जरी एकमत झाले नसले तरी पहिली यादी जाहीर करण्यावर एकमत झाले आहे. यादी जाहीर करण्याचा मुहूर्तही ठरला आहे. त्यानुसार नवरात्रीच्या मुहूर्तावर महायुतीची पहिली यादी जाहीर होईल अशी चर्चा आहे. यात केवळ भाजप उमेदवारांची नावे असतील की शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांची ही नावे असतील हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे. पण नवरात्रात पहिली यादी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world