Satara| कोयना धरणात तब्बल 100 TMC पाणीसाठा, धरणाचे दरवाजे 11 फुटांवर उघडले | NDTV मराठी

साताऱ्यातील सर्वच प्रमुख धरणांमधून विसर्ग वाढवण्यात आला.कोयना धरणात तब्बल १०० टीएमसी पाणी साठा झाला असून धरणाचे दरवाजे अकरा फुटांवर उघडण्यात आले आहेत.त्यामुळे तब्बल ८० हजार क्युसेक्स पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे.दरम्यान धोम धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. विसर्ग ११,७३१ क्युसेक करण्यात आला आहे.धरणांतून सोडण्यात येणाऱ्या पाण्याबरोबरच पायथ्याखालून येणाऱ्या पाण्यामुळे नदीपात्रातील विसर्ग आणखी वाढू शकतो. त्यामुळे कृष्णा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे आणि नागरिकांना योग्य ती दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.

संबंधित व्हिडीओ