Global Report| भारत-चीन मैत्रीस कारण... Trump?; ट्रम्पनी अव्हेरल्यानं चीनशी जवळीक? NDTV मराठी

चीन आणि भारत हे आशियातील प्रतिस्पर्धी नसून ते एकमेकांना पूरक देश आहेत...असं विधान केलं तर ते आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास करणाऱ्या अनेकांच्या भुवया उंचावतील. पण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या लहरी परराष्ट्र धोरणामुळे असं विधान करावं लागतंय... त्याचं झालंय असं की रशियाला धडा शिकवण्याच्या नादात अमेरिकनं भारतावर 50 टक्के कर लावलाय. कदाचित रशिया-युक्रेन संघर्षात तोडगा निघाला नाही, तर परवडत नसलं तरी चीनबाबतही अमेरिकेला तसं धोरण स्वीकारावं लागेल. शिवाय चीन आणि अमेरिका यांचे संबंध काही फार मैत्रीचे वैगरे नाहीत. त्यामुळे चीनला भारताशी संधान बांधून अमेरिकेची मक्तेदारी संपवण्याची आयती संधी यानिमित्तानं चालून आलीय. त्याचाच एक भाग म्हणून चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी दोन दिवसाचा भारत दौरा आटोपून मंगळवारी चीनला परत गेले. पाहूयात याच दौऱ्यामागील आंतरराष्ट्रीय संबंधांच्या गुंतागुंतीवर प्रकाश टाकणारा एक खास रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ