अखेर रशिया युक्रेन युद्धविरामाच्या दिशेनं एक महत्त्वाचा टप्पा दृष्टीपथात आलाय. ट्रम्प-पुतीन आणि ट्रम्प झेलेन्स्की यांच्या भेटीनंतर आता पुतीन-ट्रम्प-झेलेन्स्की अशी त्रिराष्ट्रीय बैठक होणार आहे. तसे संकेत खुद्द अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच दिलेत. सोमवारी झेलेन्स्की आणि युरोपीय नेत्यांसह ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये चर्चा झाली आणि ट्रम्प यांनी भविष्यातील महत्त्वाच्या बैठकीसाठी आपण स्वतः प्रयत्न करतोय असं जाहीर केलं. आता ट्रम्प -पुतीन यांच्या बैठकीत नेमकं काय झालं हे जरी स्पष्टपणे जाहीर झालेलं नसलं तरी पुतीनही एक पाऊल मागे यायला तयार आहेत तर झेलेन्स्की यांनाही त्यांचा हट्ट सोडावा लागेल असं ट्रम्प यांनी सुनावलंय. त्यामुळे दोन्ही पक्ष नेमके कोणत्या बाबींवर राजी झालेत आणि त्यानंतर आता खरोखरच गेल्या तीन-साडेतीन वर्षांचा नरसंहार थांबणार का पाहूया एक रिपोर्ट.....