एकीकडे रशिया युक्रेन युद्धविरामाच्या दिशेनं हालचाल सुरु झालेली असतानाच आता दुसरं युद्धही थांबण्याची शक्यता निर्माण झालीय. हमास मध्यस्थ राष्ट्रांनी दिलेल्या युद्धविरामाच्या प्रस्तावावर तयार झाल्याची माहिती हमासमधील सुत्रांनी एफपी या वृत्तसंस्थेला दिलीय. कोणत्याही नव्या अटीशर्तींशिवाय हमास हा प्रस्ताव स्वीाकरण्यास तयार आहे, हे ही विशेष, या बातमीला कतार या मध्यस्थ राष्ट्रानंही दुजोरा दिलाय. त्यामुळे आता इस्रायलकडून काय प्रतिसाद मिळतो यावर या युद्धाचं भवितव्य अवलंबून आहे