अहिल्यानगरचं राजकारण सध्या तापलंय.त्याला निमित्त ठरलंय एका कीर्तनाचं.एका कीर्तनकारानं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना जीवे मारण्याची खुलेआम धमकी दिलीय.आम्हाला नथुराम व्हावं लागेल, या शब्दात थोरातांना धमकी देण्यात आली. बाळासाहेब थोरात तसे शांत आणि नम्र मग सध्या एका कीर्तनानंतर थोरातांच्या संगमनेरमधलं राजकारण का पेटलं.