पुण्यातल्या बिबेवाडी परिसरामध्ये अज्ञातांनी वाहनांची तोडफोड केली आहे. तीन संशयितांनी पन्नास वाहनांची रात्रीच्या वेळी ही तोडफोड केली आहे. पुण्यात वाहनांच्या तोडफोडीचं सत्र कमी होण्याचं काही नाव घेत नाहीये. या प्रकरणी पुण्यातील बिबेवाडी पोलीस स्टेशन मध्ये आरोपींविरोधात गुन्हा दाखल झालाय. पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलंय.