Ganeshotsav सणाला राज्यात धामधुमीचं वातावरण, Mumbai, Navi Mumbai, पुण्यात पोलिसांचा तगडा बंदोबस्त

राज्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धामधुमीचं वातावरण आहे. शनिवारी दहा दिवसांच्या गणपतींचं विसर्जन होणारेय.. यानिमित्ताने मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यात पोलिसांची जोरदार तयारी सुरू झालीय.. विसर्जनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी रस्त्यावर असते. गणपतीच्या मिरवणुका आणि गणेशमूर्तींचं विसर्जन सुरुळीत पार पडण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर असते. यासाठी आतापासून बंदोबस्ताची तयारी सुरू झालीय.. मुंबईत 7 हजारहून अधिक मोठ्या गणपतींचं विसर्जन होणारेय. तर 341 विसर्जन ठिकाणांवर विसर्जनाचं नियोजन करण्यात आलंय.. वी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून गणेश विसर्जनासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. २५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या विसर्जनासाठी पोलीस, होमगार्ड, ट्रॅफिक वॉर्डन, आरसीपी आणि क्यूआरटी पथकांसह तब्बल २ हजारांहून अधिक मनुष्यबळ तैनात करण्यात येणार आहे. तर पुण्यात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी पर्यायी मार्गांचं नियोजन केलंय. रहदारीच्या रस्त्यांवरून वाहन दुसरीकडे वळवण्यात आलीयेत. जेणेकरून प्रवासी वाहनं आणि मिरवणुकीची गर्दी एकाच मार्गावर होणार नाही..

संबंधित व्हिडीओ