केंद्रीय निवडणूक आयोगातच फूट? नेमंक काय घडलंय? सत्ताधारी-विरोधकांनीही दिल्या प्रतिक्रिया |NDTV मराठी

एसआयआर प्रक्रिया, ईव्हीएम मशिन आणि सत्ताधारीधार्जणे निर्णय अशा मुद्द्यांमुळे वादात सापडलेल्या निवडणूक आयोगातच आता फूट पडल्याची चर्चा आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात त्यांच्याच दोन सहकाऱ्यांनी मनमानी करत असल्याचा आरोप केलाय. आपला विरोध डावलून किंवा मत विचारात न घेता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी निर्णय घेतल्याचा आरोप आहे. याबाबत सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी कॅबिनेट सचिवांकडे तक्रार केलीय.. गेल्या दहा महिन्यांत किमान १४ वेळा या दोन्ही निवडणूक आयुक्तांनी आयोगाच्या निर्णयप्रक्रियेबाबत वेळोवेळी आक्षेप नोंदवलाय.निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालंय..याबाबत उद्धव ठाकरेंनी काय प्रतिक्रिया दिलीय. निवडणूक आयोगातील फुटीवरून मुख्यमंत्री फडणीसांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय.. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवा अशी मागणी संजय राऊतांनी केलीय. तर सुप्रिया सुळेंनीही यावर प्रतिक्रिया दिलीय पाहुयात.

संबंधित व्हिडीओ