नवी मुंबईतील ऐरोली येथे साक्षात बोलक्या बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. गेल्या २० वर्षांपासून या बोलक्या बाप्पाची परंपरा जपली जात असून, यंदाही गणेशभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.भांडुपचे प्रसिद्ध मूर्तिकार प्रफुल कदम यांनी ही आकर्षक मूर्ती साकारली आहे. बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी तसेच आकर्षक देखावा पाहण्यासाठी पुणे, पनवेलसह विविध भागांतून गणेशभक्त ऐरोलीत दाखल होत आहेत.