संयुक्त राष्ट्रांच्या या ८१व्या महासभेसमोरच अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्या इऱाणवरील कारवाईचं समर्थन केलं. शिवाय इराणवर नव्यानं मोठे हल्ले केले जातील असा इशाराही त्यांनी सर्व
नेत्यांसमोर दिलाय. तसंच त्यांनी जगासमोर इराण संदर्भात दोन पर्याय ठेवले. इराणसह नवा करार लवकरत लवकर करून त्यांना पुन्हा समृद्ध इराण तयार करण्याची संधी द्यावी की तिथली इराणची इस्लामिक राजवट उलथवून टाकून त्यांना नरकात पाठवू, असा प्रश्न त्यांनी जगाला केल. दरम्यान नोव्हेंबरमध्ये इराणसह करार होण्याची आशा ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.