संयुक्त राष्ट्रांची ८१वी महासभा न्यूयॉर्कमध्ये पार पडली. या सभेत यावेळी नेत्यांचा बेधडकपणा दिसला. शेरेबाजी दिसली, टोमणे ही मारले गेले, तर नाराजीनाट्य ही दिसलं. अनेक जागतिक मुद्द्यांवर चर्चा करताना विविध राष्ट्रप्रमुखांनी आपले विचार मांडले. अशात या सभेसमोर बोलताना नेहमीप्रमाणेच ट्रम्प यांनी आपणच कसे जगाचे शांतीदूत आणि कसे जागतिक नेते आहोत हे ठसवून सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. तर युरोपीय नेत्यांची काहीशी नाराजी या सभेतही दिसली. विशेषतः अमेरिकेच्या सध्याच्या वर्तनावरून..
तर अर्थातच सध्या सुरु असलेल्या अमेरिका आणि इराणमधील संघर्षाचं सावटही या महासभेवर जाणवलं. अमेरिका-क्युबामधील वाद, इस्रायल-हिजबुल्लाह-गाझामधील तणाव या सगळ्यांचे पडसाद या महासभेत पुरेपूर उमटले.