नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत सध्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नक्की कोणत्या पक्षाकडे जाणार ? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेलं असतानाच नाशकात गिरिश महाजन यांना शुभेच्छांचे बॅनर झळकतायत.. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांकडून शिवसेना आणि राष्ट्रवादीला डिवचलं काम सुरू आहे का असा सवाल उपस्थित होतोय..